रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By

यात्रा बद्रीनाथची

बद्रीनाथ हे भारतातील सर्वात प्राचीन क्षेत्र आहे. सतुगात याची स्थापना झाली असं म्हणतात. आदियुगात नर आणि नारायण, त्रेतायुगात भगवान राम, व्दापार युगात वेद व्यास आणि कलियुगात शंकराचार्य हे अवतार झाले. 

शंकराचार्यांनी बद्रीनाथला हिंदुधर्माची पुनर्स्थापना केली. बोरांचे प्रचंड वन अवतीभोवती पसरलेले असल्यामुळे या परिसराला बदरीवन म्हणतात. आता या स्थळापर्यंत बससेवा चालू आहे. या प्रवासात एका बाजूला खोल दरी, अलकनंदेचा प्रचंड आवाज, दुसरीकडे नीळकंठ पर्वताचे उंच कडे, पठार आणि मध्ये चिंचोळा रस्ता हा प्रवास करताना आकाशात भरारी मारल्याचा भास होतो.
गौरीकुंड (केदारनाथ)- हा प्रवास सुरू करताना सर्व प्रवासी गौरी कुंडार्पत येऊन मुक्काम करतात. त्यानंतरचा प्रवास पायी, घोडय़ाने किंवा डोलीने सुरू होतो. सर्व प्रवासी प्रथम नारी कुंडात स्नान करून गौरीदेवी मंदिराचे दर्शन घेतात. त्यानंतर केदारनाथच्या प्रवासाला सुरुवात होते.
 
काही अंतरावर रामवाडा चट्टी लागते. या ठिकाणी नाश्ता करून पुढील 6 कि.मी.चा प्रवास सुरू होतो. गौरीकुंड ते केदारनाथ पायवाट 15 कि.मी. असून समुद्रसपाटीपासून 3584 मीटर उंच हे क्षेत्र आहे. बारा जेतिर्लिगापैकी हे एक आहे. या मंदिराची निर्मिती पांडवांनी केली असून भारतातील इतर मंदिरापेक्षा वेगळ प्रकारची बांधणी आहे.
 
मुनोत्री (हनुमानचट्टी)- हिमालातील चार पवित्र ठिकाणांपैकी एक ठिकाण म्हणजे मुनोत्री. हरिद्वारपासून निघून व्हाया हृषीकेश, मसुरीमार्गे बस जाते. हा बिकट वळणावळणाचा रस्ता आहे. वाटेत डामटा, बडकोट, सानचट्टी ही गावे लागतात. शेवटचे बसचे ठिकाण हनुमानचट्टी आहे. हनुमानपट्टी ते मुनोत्रीच वाटेवर नारदचट्टी, फुलचट्टी, जानकीचट्टी ही ठिकाणे आहेत. मुनोत्री 3323 मीटर उंचावर असून येथून बरीच हिमशिखरे दिसतात. मुनानदीचे थंडगार पाणी आणि मुनोत्री मंदिराजवळ गरम पाणचे तप्त कुंड आहे. गरम पाण्याच्या स्नानाने प्रवासाचा शिणवटा जातो.
 
गंगोत्री-भागीरथी नदीचे उगमस्थान म्हणजे गंगोत्री. गंगेचा खरा उगम येथून 18 कि.मी. वरील गोमुख या बर्फाच्या ग्लेशिरमधून होतो. येथे
जाण्यासाठी जंगल तोडून रस्ता बनविला आहे. राजा भगीरथाने तपश्चर्या करून स्वर्गातून गंगेस पृथ्वीवर आणली. जेथे तप केले ती शिळा गंगोत्री मंदिराजवळ आहे. गंगेचे मंदिर 19 व्या शतकाच्या प्रारंभी गोरखा सरदार अमरसिंह थापाने बांधले. नंतर जयपूर दरबाराने मंदिराचा जीर्णोद्धार केला. मंदिरात गंगेची संगमरवरी मूर्ती असून पाशी सरस्वती, मुना, श्रीगणेश, शंकरार्चा या मूर्ती आहेत. मंदिर 3140 मीटर उंचीवर असून त्याची स्थापना आद्य शंकरार्चानी केली आहे. गंगेचे पाणी थंडगार असले तरी भाविक त्या पाणने स्नान करतात. येथील गंगाजल बरोबर नेतात.

म. अ. खाडिलकर