गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Updated : शुक्रवार, 15 जून 2018 (09:13 IST)

जगातील आनंदी लोकांचा देश

ज गातील आनंदी देशांच्या यादीत फिनलंड पहिल्या पाच नंबर मध्ये आहेच पण हवामान आणि लाइफस्टाइलमध्ये हा देश अन्य देशांच्या पुढे आहे. येथे जगाच्या अन्य देशांच्या तुलनेत रात्र मोठी असते, थंडीही खूप असते त्यामुळे या देशात फिरायला जायचे असेल तर उन्हाळा पाहून जायला हवे. हा देश सरोवरांचा देश म्हणूनही ओळखला जातो. या देशात 2 लाखांपेक्षा अधिक लहान मोठी सरोवरे असून त्यातील सर्वाधिक राजधानी हेलसिंकी येथे आहेत. या सुंदर शहराला ब्ल्यू सिटी असेही म्हटले जाते. सरोवरे खूप संख्येने असल्याने बेटेही खूप आहेत. त्यातील एक तर फक्त महिलांसाठी असून येथे महिलांना रिलॅक्स होता यावे यासाठी रिसोर्ट, स्पा आणि अन्य सुविधा आहेत. येथे जाण्यासाठी ऑनलाइन मुलाखत यावी लागते. त्यानंतर खोली बुक होते. लँपलँड ही फिनलंड मधली सर्वात थंड जागा असून येथे बहुतेकवेळ रात्र असते. मार्च ते जून या काळात येथे उजेड असतो आणि वर्षातील सुमारे 200 रात्री येथे पोलर लाईट ज्याला नॉर्दन लाईट म्हटले जाते ते पाहता येतात. निसर्गाचा हा चमत्कार माणसाला थक्क  करून सोडतो. फिनलंडध्ये कुणीही बेघर नाही. येथे गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार जवळजवळ नाहीच. फिनलंड देशाने जगाला पहिला वेबब्राउझर दिला आहे आणि येथे प्रत्येक 10 प्लॅस्टिक बाटल्यांपैकी 9 रीसायकल केल्या जातात.