शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By

स्वस्तातली भटकंती

दोस्तांनो, दिवाळीनंतरचे दिवस म्हणजे धमाल करण्याची संदी! पण खिसा थोडा हलका आहे आणि भटकंतीला जायचं आहे. सो डोंट वरी. भारतात अशी ठिकाणं आहेत जिथे अगदी कमी पैशात भटकंती करता येते. बजेट ट्रॅव्हलिंगच्या तयारीला लागायचं तर हे वाचा.... 
 
* हिमाचल प्रदेशातलं कसौली हे ठिकाण स्वस्त आणि मस्त भटकंतीचा सॉलिड ऑप्शन! सिमला, कुल्लू, मनालीपेक्षा या ठिकाणी अनोखी शांतता आणि निसर्गसौंदर्य या दोन्हींची अनुभूती घेता येईल. 
 
* रोजच्या ताणतणावापासून थोडी मोकळीक हवी असेल तर पॉडिचेरीच्या अरविंदो आश्रमात मोफत राहण्याची सोय होऊ शकते. पाँडिचेरी हे परफेक्ट डेस्टिनेशन ठरू शकतं. 
 
* कोडाईकनालबद्दल आपण अनेकदा ऐकलं असेल. या ठिकाणी 200 रुपयात चांगलं हॉटेल मिळून जातं! नॉनव्हेजचे दर्दी असाल तर फक्त 20 रपयात झक्कास तळलेलं चिकन मिळेल. 
* गोव्यातही या काळात स्वस्त भटकंती करता येते. निरनिराळ्या बीचवर फिरत तुम्ही अनोखी अनुभूती घेऊ शकता. 
 
* जरा वेगळं ठिकाण एक्सप्लोअर करायचं असेल तर इटानगरला जा. या ठिकाणी स्थानिकांच्या घरी राहून येथल्या संस्कृतीची ओळखही करून घेता येते. 
 
* राजस्थानातलं पुष्कर हे ठिकाण धार्मिक महत्त्वासोबत सौंदर्यासाठीही प्रसिद्ध. या ठिकाणी उंटावर बसून शहराची छान सफर करता येते. चविष्ट राजस्थानी जेवण आणि सौंदर्य यांची अनुभूती येथे घेता येईल. 

* चॉकलेट प्रेमी असाल तर उटीसारखं दुसरं ठिकाण नाही दोस्तांनो. येथे चॉकलेट अगदी स्वस्तात मिळू शकतात.