suvichar
✕

हिमालयाच्या कुशीतले मसुरी

Updated: सोमवार, 14 मे 2018 (08:52 IST)
 
हिमालयाच्या कुशीत २००५ मीटर उंचीवर हे गाव वसले आहे. हे गाव ज्या टेकडीवर बसले त्याचा आकारही 'सी' अक्षरासारखा आहे. याच्या उत्तर भागातून पाहिल्यास हिमाच्छादित हिमालय दिसतो, तर दक्षिणेत द्रोणस्थली दिसते. पूर्वेला टिहरी-गढवाल व पश्चिमेला चकराता दिसते. 
 
कॅप्टन यंगने १८२७ मध्ये हे पर्यटन स्थळ शोधून काढले असे म्हणतात. मसुराची रोपे इथे बर्‍याच प्रमाणात होती, म्हणूनच त्याला मसुरी हे नाव पडले. डेहराडूनचे छत ही सुद्धा मसुरीची ओळख आहे. 
 
इतर हिल स्टेशनपेक्षा मसुरी वेगळे आहे. मसुरीत पहिल्यांदा लंढोर बाजार वसविला गेला. त्यानंतर त्याचा इतरत्र विस्तार झाला. उन्हाळ्यात तिकडे मैदानी प्रदेशात उन्हाच्या चटक्यांनी लोकं भाजून निघालेले असताना इथले वातावरण मात्र थंड असते.
 
मसुरी परिसरातील पर्यटनस्थळे
 
गनहिल - या डोंगरावर म्हणे इंग्रजांनी एक तोफ ठेवली होती. ती रोज बारा वाजता डागली जायची. म्हणून या टेकडीचे नाव गनहिल पडले. खरे तर तिची उंची पाहिल्यानंतर तिला टेकडी म्हणण्याचे धाडस होणार नाही. तिची उंची आहे ७२०० फूट. येथे मॉलरोडवर असलेल्या रोपे वेनेही जाता येते. पायीसुद्धा येथे जाता येते. गनहिलवरून दुनघाटी, जौनपुर घाटी, ऋषिकेशसह चकराता डोंगररांगा व हिमाच्छादित शिखरांचे दर्शन घेता येते. 
 
कॅंप टी फॉल- मसुरी-यमांनोतरी मार्गावर मसुरीपासून पंधरा किलोमीटरवर असलेला हा धबधबा पाच धारांमधून कोसळतो. त्यामुळे हा धबधबा पाहण्यासारखा आहे. समुद्रसपाटीपासून याची उंची चार हजार पाचशे फूट आहे. त्याच्या चहू बाजूंनी डोंगररांगा दिसतात. इंग्रजांची 'चहा पार्टी' म्हणे इथेच व्हायची. म्हणूनच या धबधब्याला कॅप टी असे म्हणतात. 
 
लेकमिस्ट- कॅप टी धबधब्याहून परतताना लेकमिस्टला येता येते. 
 
म्युन्सिपल गार्डन- पूर्वी या उद्यानाला बोटॅनिकल गार्डन म्हणून संबोधले जात असे. प्रसिद्ध भूशास्त्रज्ञ डॉ. एच. फाकणार लॉगी यांनी त्याची निर्मिती केली होती. १८४२ च्या सुमारास या भागाल एका सुंदर उद्यानात परावर्तित केले. त्यानंतर याची देखभाल कंपनी प्रशासनाकडून व्हायला लागली. म्हणून आता त्याला कंपनी गार्डन किंवा म्युन्सिपल गार्डन असे म्हटले जाते. 
 
तिबेटी मंदिर- बौद्ध संस्कृतीचे प्रतीक असणारे हे मंदिर पर्यटकांचे मन मोहून घेणारे आहे. या मंदिराच्या मागे ड्रम लावले आहेत. ते वाजविले असता आपली कोणतीही इच्छा पूर्ण होते, अशी समजूत आहे. 

सर्व पहा

माझ्या वैयक्तिक आयुष्याचा तमाशा करू नका," कोमल राणीसोबतच्या अफेअरच्या अफवांवर गोविंदानी मौन तोडले

इंडियन आइडल 17:हिमेश रेशमिया सिंगिंग रिॲलिटी शोमध्ये परतणार, निर्मात्यांनी मोठी घोषणा केली

सिंगापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आमिर खानचा सन्मान होणार, या चित्रपटाला 'स्क्रीन आयकॉन' पुरस्काराने सन्मानित केले जाणार

ज्येष्ठ अभिनेते मुश्ताक खान यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन

Hurun Rich List 2026: संपत्तीत लक्षणीय घट होऊनही शाहरुख खान भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेता, अमिताभ बच्चन दुसऱ्या क्रमांकावर

सर्व पहा

नाना पाटेकर यांचा मृत्यू अनैसर्गिक होता का? गोवा पोलिसांनी UD चा गुन्हा दाखल केला

विंध्यचलच्या विंध्यवासिनी देवीचे दर्शन का मानले जाते महत्त्वाचे? मंदिराची कथा आणि यात्रा

दिल्ली न्यायालयाने अभिनेत्रीला दिलासा दिला! वर्क व्हिसाचे नूतनीकरण करू शकणार

विराट बाद झाला की नाना पाटेकर सोडायचे जेवण; क्रिकेटसोबतच नेमबाजीतही होते निपुण

पहाटे २:३० वाजता मित्राला मेसेज "मला बरं वाटत नाहीये..." अन् ३ तासांत सगळंच बदललं; नाना पाटेकर यांच्या शेवटच्या क्षणांची कहाणी

पुढील लेख
Show comments