शुक्रवार, 24 मार्च 2023
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By अनिरुद्ध जोशी|
Last Updated: मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020 (14:44 IST)

करसोग व्हॅलीचे 7 रहस्य जाणून

हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील मंडी नगर पासून 125 किमी लांब दक्षिण-पूर्वेस समुद्र तळापासून 1404 मीटर उंचीवर हिमालयाच्या पीर पंजाळ पर्वताच्या रांगेत वसलेले गूढ आणि मंदिरांची दरी करसोग व्हॅली आपल्या पारंपरिक चाली रीती, अनोखी लोक संस्कृती, पौराणिक मंदिर आणि सफरचंदाच्या बागेत आणि पाईन झाड चिल झाड, अक्रोड, असंख्य औषधी इत्यादीने सुशोभित अशी व्हॅली आहे. ज्याचे सौंदर्य बघण्यासारखे आहे.
शिमला पासून हे 106 किमी लांब आहे. तर जाणून घ्या याचे 7 आश्चर्यकारक रहस्ये.
 
1 पांडवांनी अज्ञात काळात इथेच वेळ घालवला होता. आणि असे ही मानतात की ते इथूनच हिमालय पार करून उत्तरे कडे गंधमादन डोंगरावर पोहोचले होते, इथेच भीम आणि रामभक्त हनुमानाची भेट झाली होती. द्वापर युगात पांडव अज्ञात वासात असताना त्यांनी काही काळ करसोग व्हॅलीत घालवला होता. ते आपली पूजा इथेच करायचे. 
 
2 सफरचंदाच्या सम गव्हाचा दाणा -
इथे पांडव काळापेक्षा जुने एक देऊळ आहे ज्याला ममलेश्वर देऊळ म्हणतात. इथल्या दोन गोष्टी चकित करतात. पहिली म्हणजे भेखलच्या झुडपाने बनलेला सुमारे दीड फूट व्यासाचा ड्रम, आणि दुसरे म्हणजे सुमारे 150 ग्रॅम वजनी कणकेचा दाणा. कनक म्हणजे सोनं किंवा धोत्रा कनकच्या दाण्याचा प्रश्न आहे तर काही लोकं ह्याला गव्हाचा दाणा देखील म्हणतात. जर गव्हाचा दाणा आहे तर ही संशोधनाची बाब आहे. माहुनागाच्या देऊळात देखील अशेच एक ड्रम आहे, जे त्याच झुडुपाच्या उर्वरित भागाने बनलेली आहे. इथल्या माहुनागाला महाभारतातील कर्णाचे रूप मानले आहे. ही संपूर्ण सुकेत रियासत मध्ये पुजणारे देव आहे, जे लोकांची साप, जंत आणि कीटकांपासून संरक्षण करतात.
 
3 असे मानले जाते की मंदिराच्या परिसरात सुमारे 100 पेक्षा जास्त शिवलिंग दडलेले आहेत, या मधून बरेचशे काढले आहेत. या देऊळासह एक जुने देऊळ आहेत जे बंद आहेत. असे मानले जाते की देऊळ भुंडा यज्ञासाठी उघडले होते. इथे पांडवाच्या काळातील बऱ्याच दुर्मिळ वस्तू आहे.
 
4 गरम आणि थंड पाण्याची एकत्र धार - 
करसोग पासून शिमला जाण्याच्या वाटेत 'तत्तापाणी' नावाचे सुंदर ठिकाण आहे. हे स्थळ गंधकाच्या गरम पाण्याच्या चष्म्यासाठी प्रख्यात आहे. एकीकडे बर्फाच्या प्रमाणे सतलुजचे थंड पाणी जे आपल्या शरीराला गारठून देतं तर तिथेच नदीच्या कुशीतून निघत असलेले गरम पाणी हे पर्यटकांसाठी एखाद्या आश्चर्य पेक्षा कमी नाही. सतलुजच्या टोकावर गंधक असलेल्या गरम पाण्यात अंघोळ करायला लोक वर्षभर येतात. मंडी पासून 46 किमी लांब छत्रीचा मगरू महादेवाचं देऊळ आहे. याचे लाकडी काम प्रख्यात आहे. 
 
5 करसोग खोऱ्यात घनदाट देवदाराच्या अरण्याने वेढलेल्या मुख्य 3 तलाव आहेत, जे निसर्ग प्रेमींना भारावून टाकतात. पाहिलं पराशर तलाव, दुसरे कमरूनाग तलाव आणि तिसरे रिवालसर तलाव. पराशर तलाव जवळ पराशर मुनींचे आश्रम आहे. असे म्हणतात की पाण्यासाठी ऋषी पराशराने आपले गुर्ज(शस्त्र)जमिनीवर मारले तेव्हा जमिनीतून पाण्याच्या धारेचा प्रवाह फुटला आणि या पाण्याच्या धारेने तलावाचे रूप घेतले पण त्या जमिनीला पाण्याची एकही थेंब भिजवू शकली नाही. ज्या जमिनीवर ऋषी तपश्चर्या करतं असे.
 
6 कमरूनाग तलावात पुरलेला खजिना - 
कमरूनाग तलावाच्या काठावर कमरूनागाचे प्राचीन देऊळ आहे. आख्यायिकांनुसार कमरूनाग राजा रत्न यक्ष होते. मागील जन्मात कमरूनागच्या रूपात अवतरले होते. महाभारताच्या युद्धानंतर पांडवांनी त्यांना आपले आराध्य देव मानून या ठिकाणी त्यांना स्थापित केले. कमरूनागाला पावसाचे देव म्हणून मानतात. असे मानतात की कमरूनाग तलाव हे सर्वात जुने आहेत. स्थानिक लोकं या तलावात कोट्यवधीने खजिना असण्याचे अंदाजे लावतात. म्हणतात की हा खजिना कोणी लपविला नसून लोकांच्या आस्था आणि विश्वासाखातर लोकांनी आपले दागिने तलावाकडे अर्पण केले आहे. या तलावात असे हजारो वर्षांपासून होत आहे. तलावात सोनं चांदी अर्पण करण्याची प्रथा शतकानुशतके सुरूच आहे. 
 
7 रिवालसर तलाव - रिव्हल्सर किंवा रिवालसर हे बौद्ध गुरु आणि तांत्रिक पद्मसंभव यांची उपासना स्थळ मानले जातात. हे तलाव मंडी पासून सुमारे 25 किमी लांब आहे. प्रायश्चित्त म्हणून लोमेश ऋषींनी शिवाजींसाठी रिवालसरात तपश्चर्या केली होती. असे म्हणतात की मुघल साम्राज्याशी लढा घेत 1738 मध्ये गुरु गोविंद सिंह यांनी रिवालसार तलावाच्या शांत अशा वातावरणात काही काळ घालवला होता. रिवालसार तलाव हे आपल्या वाहत्या रीडच्या बीटा साठी लोकप्रिय आहे. असे म्हणतात की या पैकी 7 बेटं हवेने आणि प्रार्थनेने हालतात. प्रार्थनेसाठी इथे एक बौद्ध मठ हिंदूंचे देऊळ आणि शिखांचा गुरुद्वारा बनलेला आहे. या तिन्ही धार्मिक संघटनेकडून इथे नौकाविहार करण्याची सुविधा दिली गेली आहे. या तलावावर मातीच्या टेकड्या तरंगताना दिसतात, या वर सरकांडांचे उंच गवत लागलेली असते. टेकड्यांची तरंगण्याच्या आश्चर्य कारक नैसर्गिक प्रक्रियेमुळे या तलावाला पावित्र्य तलाव मानतात. वैज्ञानिक तर्क काहीही असो पण टेकड्यांचे तरंगणे हे दैवीय चमत्कार मानले जाते. 
 
मुक्कामी ठिकाण -
करसोग व्हॅली मध्ये डिसेंबर मध्य ते फेब्रुवारी महिन्यात जाणं चांगले नाही, कारण या महिन्यात बर्फ पडल्यामुळे वाटा बंद होण्याचा धोका नेहमी असतो. इथे थांबण्यासाठी शासकीय विश्राम गृहे, रेस्तराँ, सराय यांच्या योग्य व्यवस्थेमुळे आपण येथे आरामात राहू शकता. या व्हॅलीत जाण्यासाठी दिवस-रात्र बस तसेच टॅक्सी च्या सुविधेमुळे पर्यटक सहजच येथे पोहोचू शकतात.