शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. जन्मदिवस आणि ज्योतिष
Written By
Last Modified: बुधवार, 8 ऑगस्ट 2018 (00:49 IST)

दैनिक राशीफल 08.08.2018

मेष : व्यवहार कुशलतेतून व्यापारात यश. स्थायी संपत्ति मिळण्याचा योग. ग्राहकांशी संबंध मधुर बनतील.
 
वृषभ : प्रिय व्यक्तिची भेट घडेल. कामात उन्नति होईल. स्फूर्ति राहील. धार्मिक गोष्टीत रस घ्याल. व्यक्तिगत अडचण राहू शकते.
 
मिथुन : नवीन कार्ययोजनेचे प्रबळ योग. प्रेम संबंधात यश प्राप्ति. घरात शांतता राहील. मान-सन्मान व यश प्राप्त होईल.
 
कर्क : बुद्धिच्या प्रयोगाने कामात वृद्धि होईल. शत्रुंपासून हानि होण्याची शक्यता. कायदेशीर बाबी सुधारतील. लाभ होण्याचे योग.
 
सिंह : नवीन संबंध बनतील. सत्संग होईल. मानसिक शांति ठेवा. घरात पाहुणे येण्याची शक्यता. व्यापार व्यवसाय मध्यम राहील.
 
कन्या : यात्रा संभवते. रागावर नियंत्रण ठेवा. नातेवाईकांच्या भेटी होतील. दांपत्य सुखात कमी. नवीन संबंध बनतील.
 
तूळ : सामाजिक क्षेत्रात लाभ प्राप्तिचा योग. गूढ कार्यात यश प्राप्ति .सामाजिक क्षेत्रात धार्मिक अनुसंधानाचा योग.
 
वृश्चिक : दुसर्‍यांवर विश्वास ठेऊ नका. व्यापार व्यवसाय उत्तम आणि लाभकारी राहील. आई-वडिलांच्या तब्बेती चांगल्या राहतील. नवे संबंध लाभदायी ठरतील.
 
धनु : आय-व्ययमध्ये संतुलन राहील. कार्यक्षमतेत वृद्धि होईल. मानसिक अस्थिरता दूर करण्याचा प्रयत्न करा, आणि कामांना वेळेत पूर्ण करा.
 
मकर : मुलांकडून सुखद बातमी कळेल. शुभ संदेश नवीन दिशा देईल. कौटुंबिक समस्यांवर दुर्लक्ष करू नका.
 
कुंभ : भाग्यवर्धक कामात लाभ प्राप्ति योग. अनुसंधान कामात वेळ जाईल. वरिष्ठ व्यक्तिंच्या वादांपासून लांब रहा.
 
मीन : परिवार-व्यापार संबंधी कार्यात भाग्यवर्धक यात्रा योग. मनोरंजनात लाभ प्राप्तिचा योग.