गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 16 जुलै 2024 (21:22 IST)

अभिनेत्री हिना खान पुन्हा रुग्णालयात दाखल

Actress Hina Khan
प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान सध्या स्तनाच्या कर्करोगाच्या तिसऱ्या टप्प्याने त्रस्त आहे. अभिनेत्री या जीवघेण्या आजाराचा मोठ्या धैर्याने सामना करत असून तिची केमोथेरेपी झाली आहे.तिला आज पुन्हा रुग्णालयात दाखल केले आहे. अभिनेत्री चाहत्यांकडे तिच्या चांगल्या तब्बेतीसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन करत आहे. 
अभिनेत्रीचा एक फोटो व्हायरल झाला आहे. ती बरी होण्यासाठी लोक प्रार्थना करत आहे.
 
हिना खानने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक लेटेस्ट पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करताना अभिनेत्रीने हॉस्पिटलमधील एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये हिना हॉस्पिटलच्या बेडवर आहे आणि तिचा हात दिसत आहे. ही पोस्ट शेअर करताना हिनाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, जस्ट अनदर डे दुआ. हिनाची ही पोस्ट सोशल मीडियावर येताच अभिनेत्रीचे चाहते पुन्हा चिंतेत आहे.
 
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री हिना खान ने स्वतः तिला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली होती. तिच्या या बातमीने सर्वांनाच धक्का बसला. अभिनेत्रीला थर्ड स्टेजचा कॅन्सर असल्याच्या माहितीवर विश्वास बसत न्हवता. ती तिच्या तब्बेतीची काळजी घेऊन देखील तिला हा घातक आणि जीवघेणा आजार कसा झाला याचा सर्वांनाच आश्चर्य होत आहे. 

हिनाच्या चाहत्यांनी तिच्यासाठी प्रार्थना केली.आता हिना खानवर कर्करोगावर उपचार सुरू आहेत आणि अभिनेत्रीने तिची पहिली केमोथेरपी देखील घेतली आहे

Edited by - Priya Dixit