रविवार, 21 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 1 सप्टेंबर 2021 (15:18 IST)

अभिनेत्री सायराबानोची तब्बेत बिघडली,हिंदुजा रुग्णालयात दाखल

दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांची पत्नी सायराबानो यांची तब्बेत बिघडल्याची बातमी समोर आली आहे.त्या 77 वर्षांच्या आहे.सायरा गेल्या तीन दिवसांपासून हिंदुजा रुग्णालयात दाखल असल्याचे सांगितले जात आहे.
 
वृत्तानुसार,सायरा बानो यांना श्वसनाच्या त्रास झाल्यावर रुग्णालयाच्या आयसीयू विभागात दाखल केले आहे.त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.परंतु त्यांचे बीपी अजून सामान्य होत नाही.
 
असं म्हणतात की दिलीप कुमार यांच्या निधनानंतर त्यांना मोठा धक्का बसला आणि या मुळे त्यांची तब्बेत खालावली.दिलीप कुमार यांचे निधन होऊन सुमारे 2 महिने झाले आहे तरीही त्या या दुःखातून सावरल्या नाही.
 
11 ऑक्टोबर 1966 रोजी सायरा बानो आणि दिलीप कुमार हे वैवाहिक बंधनात अडकले होते.त्या वेळी सायरा बानो या 22 वर्षाच्या तर दिलीप कुमार हे 44 वर्षाचे होते.लग्नानंतर त्यांनी एकमेकांची साथ कधीही सोडली नाही.परंतु 7 जुलै 2021 ला दिलीप कुमार यांच्या निधनानंतर बॉलिवूडची ही सर्वात यशस्वी आणि सुंदर जोडप्याची जोडी कायमची तुटली.
 
सायरा बानो यांनी वयाच्या 16 व्या वर्षी जंगली चित्रपटातून पदार्पण केले.या नंतर त्या आई मिलन की बेला, ब्लफमास्टर,पडोसन,पूरब-पश्चिम,झुक गया आसमान आणि आखरी दावं या सारख्या अनेक हिट चित्रपटात दिसल्या.वृत्तानुसार,सायराबानो या वर्ष 1963 -1969 पर्यंत सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्री होत्या.