गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 8 नोव्हेंबर 2018 (09:27 IST)

अक्षय कुमार बनला “2.0’मध्ये सुपर व्हिलन

अक्षय कुमार आणि रजनीकांत यांच्या आगामी “2.0’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळत आहे. अक्षय कुमारचा हा पहिला सायन्स फिक्‍शन चित्रपट असून यात त्याने सुपर व्हिलनची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात अक्षयने असे काम केले आहे, जे त्याने अन्य चित्रपटात केलेले नाही.
 
“2.0’मधील भूमिका सक्षमपणे मांडण्यासाठी अक्षयने आपला पूर्ण लूकच बदला आहे. याबाबत माहिती देताना अक्षयने ट्‌वीट केले की, “2.0’ची कथानक सामान्य चित्रपटापेक्षा वेगळे आहे. या चित्रपटातील माझा लूक तयार करण्यासाठी मुख्य हिरोपेक्षा अधिक वेळ लागला. मला मेकअप करण्यासाठी 3 तासांचा वेळ लागायचा, तर तो काढण्यासाठी 1 तास जायचा. जेव्हा मी स्वतःला स्क्रीनवर पाहिले तेव्हा मी अचंबीतच झालो.