गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 7 जुलै 2018 (12:39 IST)

मानधन ठरवण्याचे निकष हवेत- आलिया

बॉलिवूडमध्ये नेहमीच कलाकारांच्या भारी कमाईच्या आकड्यांवरून जोरात चर्चा होत असते. हिरोच्या तुलनेत हिरोईनना मिळणारे मानधन नेहमीच कमी असते, अशी एक सार्वत्रिक तक्रारही ऐकायला मिळते. याच चर्चेमध्ये आलियाने एक मोठा मुद्दा उपस्थित केला आहे. कलाकारांचे मानधन ठरवण्यासाठी काही निश्चित निकष असायला पाहिजेत. विशेषतः थिएटरमध्ये प्रेक्षक खेचण्याची कोणत्या कलाकाराची किती क्षमता आहे, त्यावरच मानधनाचा आकडा निश्चित व्हायला हवा, असे आलिया म्हणाली. आलिया सध्या आपल्या करिअरच्या ऐन भरात आहे. तिने कोणत्याही बड्या अ‍ॅक्टरच्या अनुपस्थितीमध्ये राजीसारखा सिनेमा 100 कोटींच्याक्लबमध्ये नेऊन पोहोचवला आहे. जर वरुण धवन आपल्या स्वतःच्या बळावर आपल्या सिनेमासाठी अधिक प्रेक्षक खेचून आणू शकत असेल, तर वरुणपेक्षा अधिक मानधन मिळवण्यासाठी मी निर्मात्यांवर दबाव आणू शकत नाही, अशी थेट तुलनाच आलियाने केली आहे. यामुळे कलाकारांचे एकतर्फी मानधन किंवा भेदभाव केला जाऊ शकणार नाही. प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी सिनेमाचा विषयही महत्त्वाचा असतो हेही तिने स्पष्ट केले. केवळ पैसे मिळवण्यासाठी आपण कधीच सिनेमात काम करणार नाही. यापूर्वीही आपण तसे केलेले नाही, हेही तिने स्पष्ट केले.