गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018 (09:13 IST)

हे दोघे तब्बल ३० वर्षानंतर एकत्र काम करणार

अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री शबाना आझमी आता ३० वर्षानंतर ते एका चित्रपटात पुन्हा एकत्र येणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग बासू करणार असून अद्याप चित्रपटाचे नाव निश्चित झालेले नाही. १९८९ नंतर २००७ मध्ये या दोघांनीही ‘ओम शांती ओम’चित्रपटात एका गाण्यासाठी त्यांनी पाहुणे कलाकार म्हणून हजेरी लावली होती. मात्र ते काम केवळ गाण्यापुरतेच होते. त्यामुळे ३० वर्षांनंतर या दोघांच्या जोडीला एकत्र पाहण्याची संधी सिनेरसिकांना मिळणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि शबाना आझमी यांच्यासोबत सैफ अली खान, आदित्य रॉय कपूर, तापसी पन्नूदेखील भूमिका साकारणार असल्याची माहिती आहे.