गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 1 मे 2018 (10:52 IST)

मंजुळे यांच्या सिनेमातून बच्चन यांची माघार

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या बॉलिवूडमधील पहिल्या ‘झुंड’ या सिनेमातून बिग बी अमिताभ बच्चन यांनी माघार घेतली आहे. सोबतच नागराज मंजुळे आणि निर्मात्यांकडून घेतलेले पैसेही परत केले आहेत.  सतत सिनेमाच्या तारखा पुढे ढकलल्या जात असल्याने त्यांना हा निर्णय घ्यावा लागला. हा चित्रपट  फुटबॉलशी संबंधित विषयावर हिंदीत बनत आहेत.
 
त्यासाठी पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात भव्य सेट लावण्यात आला होता. मात्र त्याला काही संघटनांनी विरोध केल्यामुळे तो काढावा लागला. याचा परिणाम सिनेमाच्या शेड्युलवर पडत गेल्याने, सातत्याने तारखा पुढे पुढे ढकलल्या गेल्या. त्यामुळे अमिताभ बच्चन यांचं वेळापत्रक बिघडलं. बिग बींनी मागील वर्ष हे या सिनेमासाठी राखून ठेवलं होतं. मात्र ते वेळेनुसार झालं नाही. त्यामुळे अमिताभ बच्चन यांनी हा सिनेमाच सोडण्याचा निर्णय घेतला.