शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

भुतीण अनुष्का

चित्रपट सृष्टीला भूतखेतांवरची कथानके नवी नाहीत. मात्र, आजपर्यंत जेवढे म्हणून भूतप्रेत संदर्भातील सिनेमे आले त्यात भूत नेहमी पांढर्‍या कपड्यांतच पाहिले गेले. अर्थात अनुष्का शर्माची बात काही अलग असणार यात नवल नाही.
 
अनुष्का तिच्या होम प्रॉडक्शनतर्फे बनविल्या जात असलेल्या फिल्लोरी चित्रपटात भुतीण म्हणून भूमिका साकारणार आहे. अनुष्काच या भूमिकेत असल्याने तिचे कॉस्ट्यूम खास असणार यातही नवल नाही. अनुष्का यात भूत असली तरी पांढर्‍याऐवजी गोल्डन रंगाचे कपडे वारपणार आहे. या सोनेरी रंगाचे भुताशी खास कनेक्शनही दाखविले गेले आहे. या भुताचे घर एका झाडावर असते व या झाडाबरोबर एका मुलाचे लग्न लावले जाते असे कथानक असून अंधविश्वासरील पडदा उठविण्याचा या कथानकात प्रयत्न केला गेला असल्याचे समजते.
 
या चित्रपटाचे प्रोमो खूपच मनोरंजक पद्धतीने सादर केले जात आहेत. त्याचे ट्रेलर लवकरच रिलीज होणार आहे. यात दिलजित दोसांझ याची मुख्य भ‍ूमिका आहे.