रविवार, 8 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 6 ऑक्टोबर 2021 (10:54 IST)

रामायणचे 'रावण' अरविंद त्रिवेदी यांचे निधन

दूरदर्शनच्या लोकप्रिय रामायण मालिकेत रावणाची भूमिका साकारणारे अरविंद त्रिवेदी यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. ते 83 वर्षांचे होते.
 
मंगळवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि कांदिवली येथील त्यांच्या घरी त्यांचे निधन झाले. गेल्या काही वर्षांपासून ते आजारी होते.
 
हे उल्लेखनीय आहे की अरविंद त्रिवेदी यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1938 रोजी मध्य प्रदेशातील इंदूर येथे झाला. रामायणाने घरो घरी नाव कमावणाऱ्या अरविंद त्रिवेदी यांनी सुमारे 300 हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्ये काम केले.