रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 मे 2019 (09:49 IST)

Avengers: Endgame ची जादू कायम

'Avengers: Endgame' चित्रपटाने फक्त परदेशातच नव्हे, तर भारतातही या चित्रपटाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. एस.एस.राजमौली दिग्दर्शित 'बाहुबली २' चित्रपटाचा विक्रम मोडीत काढला आहे. 'Avengers: Endgame' मागील आठवड्यात २६ एप्रिल रोजी प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटाने आतापर्यंत २४४.३० कोटी रूपयांचा गल्ला जमवला आहे.ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी चित्रपटाच्या कमाईचा आकडा ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केला आहे. बऱ्याच दिवसांपासून हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याविषयीचीच उत्सुकता चाहत्यांमध्ये पाहायला मिळाली होती. आता हा चित्रपट किती कोटींचा पल्ला गाठतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. येत्या काळातही Avengers: Endgame ची जादू कायम राहिली तर, बॉलिवूडच्या इतर चित्रपटांना याचा फटका बसू शकतो.