बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 एप्रिल 2019 (09:23 IST)

'स्लो मोशन' गाण्याकडे तरूणाई आकर्षित

'भारत' चित्रपटातील 'स्लो मोशन' नवीन गाण्यात दिशा आणि सलमान थिरकताना दिसत आहे. गाणं प्रदर्शित होताच इंटरनेटवर चांगलेच गाजत आहे. हे गाणं विशाल-शेखर आणि नाकाश अजीज यांच्यासोबत श्रेया घोषाल यांच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आलं आहे. अभिनेता सलमान खानने खुद्द त्याच्या ट्विटर अकाउंटवरून हे गाणं पोस्ट केलं आहे. त्यानंतर अभिनेत्री दिशा पटानीने सुद्धा तिच्या सोशल अकाउंटवरून गाणं शेअर केलं आहे. सध्या सलमान-दिशाचं 'स्लो मोशन' तरूणांना आकर्षित करत आहे.
 
'ओड टू माय फादर' या कोरियन चित्रपटाचा रिमेक असणाऱ्या 'भारत' चित्रपटात देशाला स्वातंत्र मिळाल्यापासून ते २०१४ पर्यंतचा काळ रूपेरी पडद्यावर झळकणार आहे.