बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 23 एप्रिल 2019 (09:37 IST)

'भारत'चा दमदार ट्रेलर रिलीज

अभिनेता सलमानचा आगामी चित्रपट भारतची आता भारतचा दमदार ट्रेलर रिलीज झाला आहे. हा ट्रेलर खुपच इंप्रेसिव दिसत आहे. या ट्रेलरमध्‍ये सर्वात आधी सलमान डायलॉग बोलताना दिसत आहे. त्‍यात तो म्‍हणतो, '७१ वर्षांपूर्वी हा देश बनला आणि त्‍यावेळी सुरू झाली माझी कहाणी.' तो स्‍वत:ला मध्‍यमवर्गीय म्‍हातारा म्‍हणतो आणि आपल्‍या रंगीन आयुष्‍याबद्‍दल सांगतो. ही लव्‍हस्‍टोरी नाही. या चित्रपटामध्‍ये जॅकी श्रॉफ, सलमानच्‍या वडिलांची भूमिका साकारत आहे. काही सीनमध्‍ये नोरा फतेही, सुनील ग्रोवरदेखील दिसत आहेत. 
चित्रपटाचे ट्रेलर येताच सोशल मीडियावर व्‍हायरल झाला आहे. यामध्‍ये प्रमुख भूमिकेत सलमान खान आहे. ३ मिनिट ११ सेकंदाच्‍या ट्रेलरमध्‍ये भारतची कहाणी काय असेल, हे स्‍पष्‍ट होत नाही. ट्रेलरमध्‍ये शेवटी सलमान भारतच्‍या सीमेवर कॅटरीनाकडे पाहून हसताना दिसत आहे. हा चित्रपट ईदच्‍या औचित्‍याने ५ जून, २०१९ ला रिलीज होणार आहे.