रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 26 जानेवारी 2019 (00:34 IST)

...आणि एका टि्‌वटुळे झाला बिपाशाचा ब्रेकअप

दमदार अभिनयामुळे बिपाशा बासूची एक वेगळी ओळख बनली आहे. सावळ्या वर्णाची असली तरी दिसायला सुंदर आणि आकर्षक असल्यामुळे बिपाशाची बॉलिवूडमध्ये करिअरची नौका पार झाली. चित्रपटात करिअर सुरू असताना तिची सर्वाधिक चर्चा झाली ती, तिच्या लव्ह लाइफबद्दल. विशेष करून, जॉन अब्राहसोबतच्या अफेअरमुळे बिपाशा चर्चेत होती. ब्रेकअप होण्याआधी, बिपाशा बासू आणि जॉन अब्राहम नेहमी पार्टी आणि इवेंटस्‌मध्ये एकत्र दिसत होते. इतकंच नाही तर जॉन अब्राहचा बर्थडे बिपाशा मोठ्या धामाधुमीत साजरा करत असे. जॉनदेखील बिपाशाचा बर्थडे साजरा करण्यात कुठलीही कसर सोडत नव्हता. दोघे एकमेकांच्या घरी पार्टी करत असे. दोघांनी 9 वर्षे एकेकांना डेट केले. महेश भट्ट यांचा प्रॉडक्शनचा चित्रपट 'जिस्म'मध्ये बिपाशा आणि जॉनने एकत्र काम केले. दोघांच्यात जवळीकदेखील निर्माण  झाली. इतकेच नाही तर दोघे लिव्ह इन रिलेशनशीपमध्येदेखील राहिले होते. परंतु, दोघांचे नाते टिकू शकले नाही. जॉन बिपाशापासून दूर झाल्यानंतर जॉनने एनआरआय प्रिया रुंचालशी गुपचूपपणे लग्न केले होते. सुरुवातीला ही अफवा असल्याचे म्हटले जात होते. परंतु, नंतर जॉनच्या एका टि्‌वटने सर्वकाही स्पष्ट केले. 2014 मध्ये जॉन अब्राहने टि्‌वट करून म्हटले होते की, त्याचे आणि बिपाशाचे नाते संपुष्टात आले आहे. जॉन अब्राहने लिहिले होते की, 'आपणास 2014 च्या शुभेच्छा. यावर्षी आपल्या आयुष्यात प्रेम, चांगले भविष्य आणि आनंद घेऊन येवो. लव्ह, जॉन आणि प्रिया अब्राहम'. जॉनने प्रियाशी लग्न केले होते आणि याची माहिती बिपाशाला नव्हती. जॉनचे हे टि्‌वट पाहून बिपाशा चिंतेत होती. या धक्क्यातून तिला सावरायला अनेक महिने लागले. पुढे बिपाशाने अभिनेता करण सिंह ग्रोवरशी विवाह केला.