करिना कपूरने उद्ध्वस्त केलं माझं करिअर?
'बरसात', 'गप्त ', 'सोल्जर', 'बिच्छू'यासारख्या गाजलेल्या सिनेमाचा नायक राहिलेला बॉबी गत दहा वर्षांपासून कामाच्या शोधात होता. परंतु या काळात त्याला एकही चित्रपट मिळला नाही. बॉबीने एका मुलाखतीत एक धक्कादायक खुलासा केला आहे. करिना कपूरने माझ्या करिअरचे नुकसान केले असे बॉबी म्हणाला.
आश्चर्य वाटले ना, पण हे खरे आहे. अर्थात बॉबीने करिनावर थेट आरोप केला नाही. पण त्याचा इशारा करिनाकडेच होता. बॉबीने मुलाखतीत सांगितल्यानुसार, 'जब वी मेट'साठी आधी बॉबी देओलचे नाव फायनल झाले होते. पण करिनाने म्हणे या चित्रपटासाठी शाहिद कपूरच्या नावाची शिफारस केली आणि पुढे सगळेच चित्र बदलले.
बॉबीने मुलाखतीत यामागची सगळी कहाणी सांगितली आहे. करिनाने असे केले नसते तर आजचे चित्र वेगळे असते, असेही तो म्हणाला.