बुधवार, 13 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: सोमवार, 4 जून 2018 (14:40 IST)

पाऊसाचे प्रकार

पुण्याचा पाऊस बायकांसारखा. त्या चिडल्या कि धड स्पष्ट बोलत नाहीत. नुसती दिवसभर पिरपिर चालु. पाऊस पण धड रपरपा पडत नाही. दिवसभर पिरपिर रिप रिप भुरभुर चालु असते. नुसता वैताग!
 
नाशिकचा पाऊस दरोडेखोर आहे
एकदा पडला तर अख्खा सराफ बाजार आणि भांडी बाजार लुटून नेतो
 
अन मुंबईचा पाऊस  
प्रेयसीच्या बापा व भावा सारखा ..
कधी येऊन टपकल 
धो धो आपल्याला धुउन निघून जाईल सांगता येत नाही
 
विदर्भाचा पाऊस
एका प्रेयसीसारखा......
सारखी वाट पहायला लावणार
वेळ कधीच नाही पाळणार.....
आला तर प्रेयसीसारखा
झुळूक दाखऊन भरsकन जाणार
अन् पुन्हा वाट पहायला लावणार....
 
मराठवाड्यात ला पाऊस म्हणजे लफडं...! जमलं तर जमलं नाहीतर साराच  हुकल...!! 
 
कोकण चा पाऊस ........
लग्न झाल्यावर संसारात गुंतून जातो तसा 
एकदा सुरवात झाली की शेवट पर्यंत धो धो धो धो धो धो पडतो ...