गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 10 डिसेंबर 2018 (11:05 IST)

दीपिकाने द्रौपदीचा रोल नाकारला

या अख्ख्या वर्षात दीपिका पदुकोणचा केवळ एकच सिनेमा रिलीज झाला. मात्र तरीही बॉलिवूडमध्ये तिच्या नावाचा बोलबाला आहे. तिने आपल्या सिनेमात काम करावे म्हणून अनेक निर्मात्यांनी फिल्डिंग लावण्याचा प्रयत्न चालू ठेवला आहे. मात्र दीपिकाने काही काळापासून अगदी निवडक सिनेमा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तिला आमिर खानच्या 'महाभारत'मध्ये द्रौपदीचा रोल दिला गेला असल्याचेही समजले होते. मात्र तिने हा रोलही नाकारला आहे. 'महाभारत' हा आमिर खानचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्याला वेळ देता यावा म्हणून आमिरने महेश थाईच्या 'सारे जहां से अच्छा' या राकेश शर्मा यांच्या बायोपिकमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्याने या सिनेमासाठी शाहरुखची शिफारसही केली होती. आमिरने 'महाभारत'ला सर्वाधिक महत्त्व दिले आहे. पण दीपिकाने 'महाभारत'ला महत्त्व दिले नाही. सध्या तरी ती आपल्या नवविवाहित आयुष्यच्या रंगीत दुनियेत रमली आहे. आता इतक्यात तरी तिच्याकडून नवीन सिनेमा केला जाण्याची कोणती खबर मिळालेली नाही. आमिरच्या 'महाभारत'ला नकार देण्यामागे काही वेगळे कारण होते का हे देखील सजलेले नाही.