गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 21 जुलै 2018 (17:10 IST)

'धडक'ला मिळाले २०१८ चे हायएस्ट ओपनिंग

मराठी सिनेमा सैराटच्या हिंदी रिमेक असलेल्या धडक सिनेमाने बॉक्स ऑफिवर चांगली ओपनिंग केली आहे. दमदार कलेक्शनमुळे या सिनेमाने दो
न मोठ्या सिनेमांचे रेकॉर्ड तोडले आहेत. धडकचा बॉक्स ऑफिसवर चांगलाच बोलबाला असून २०१८ चा हायएस्ट ओपनर सिनेमा 'राझी' ची जागा आता 'धडक'ने घेतली आहे.
 
जान्हवीच्या डेब्यू सिनेमा असूनही या सिनेमाने चांगलीच कमाई केली. ट्रेन अनालिस्ट तरण आदर्शनुसार, धडकची पहिल्या दिवसाची कमाई ८.७१ कोटी इतकी होती. या सिनेमाने करण जोहरच्या 'स्टूडेंट ऑफ द ईयर' चा रेकॉर्ड तोडला. 'स्टूडेंट ऑफ द ईयर' हा सिनेमा २०१२ मध्ये प्रदर्शित झाला असून त्याची पहिल्या दिवसाची कमाई ८ कोटी इतकी होती.