गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 30 जून 2022 (21:24 IST)

शिवसेनेला भगवान शिवही वाचवू शकत नाही- कंगना

kangana ranawat
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर, कंगना राणावतने या प्रकरणावर आपली भूमिका व्यक्त केली आहे. राजीनामा सत्रानंतर आपल्या फॉलोअर्ससाठी एका व्हिडिओ संदेशात शिवसेनेने हनुमान चालिसावर बंदी घातली त्यामुळे शिव सुद्धा त्यांना वाचवू शकत नाही. असा टोमणा कंगणा राणावतने शिवसेनेला मारला आहे.
 
इंन्स्टाग्राम या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर आपला व्हिडिओ शेअर करताना कंगनाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “जेव्हा जगात पाप वाढते तेव्हा विनाश अटळ असतो. त्यानंतर, पुन्हा नवनिर्माण असते. आता सगळ्यांच्या जीवनाचे कमळ फुलले.”
 
आपल्या व्हिडीओमध्येच कंगना राणावत म्हणते की, “भारतीय लोकशाहीच्या इतिहासात 1975 नंतर सध्याची वेळ सर्वात महत्त्वाची आहे.” 2020 मध्ये मी म्हटले होते की, लोकशाही ही एक श्रद्धा आहे, आणि जो कोणी सत्तेच्या नशेत जाऊन लोकांचा विश्वास तोडतो, त्याचा अभिमानही भंग पावतो. हे कोणा एकट्याचे विषेश सामर्थ्य नसून ज्याचे चारित्र्यशुद्ध त्या व्यक्तीचे आहे.”