शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 22 मार्च 2021 (13:47 IST)

बॉलिवूडमधील आणखी एक दुखद बातमी, चित्रपट निर्माते सागर सरहदी यांचे निधन

बॉलिवूड इंडस्ट्रीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. चांदनी, कभी-कभी आणि सिलसिलासारख्या उद्योगाला उत्कृष्ट चित्रपट देणारे लेखक आणि चित्रपट निर्माते सागर सरहदी यांचे निधन झाले आहे. ही बातमी समजताच सोशल मीडियावरील स्टार्सनी सागर सरहदीला श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली आहे. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील शीव भागात राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. ते बऱ्याच काळापासून आजारी होते. त्यानंतर काल रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला.
 
चित्रपट निर्माता हंसल मेहता यांनी सोशल मीडियावर सागर सरहदी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सागर सहदीचा फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले- 'तुमचा आत्मा शांति लाभो, सागर सरहदी साहब.' हे कुटुंब दुपारी सागर सरहदीचे अंत्यसंस्कार करणार आहे.
 
सागर सरहदीला चांदनी, सिलसिला आणि कभी-कभी यासारख्या चित्रपटांसाठी ओळखली जातात. त्यांचा जन्म 11 मे 1933 रोजी बुफा पाकिस्तानमध्ये झाला होता. मेहनतीच्या जोरावर त्यांनी बॉलिवूडमध्ये आपली ओळख प्रस्थापित केली. यश चोप्राच्या ''कभी-कभी' मधून सागर सरहदीला ओळख मिळाली. या चित्रपटात राखी आणि अमिताभ बच्चन यांची जोडी होती. त्याचबरोबर त्यांनी स्मिता पाटील, फारुख शेख आणि नसीरुद्दीन शाह अभिनित 'बाजार' या सिनेमातून दिग्दर्शनात पदार्पण केले.