शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

Insidious: The Last Key नवे पोस्टर रिलीज

Insidious: The Last Key या चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरवरची टॅगलाईनच मनात भिती निर्माण करते. हा चित्रपट तुम्हाला शांत करण्यापूर्वी तुम्ही ओरडा, किंचाळा असे टॅगलाईनमध्ये म्हटले आहे.
 
हॉलीवूडची सुपरहिट भयपटांच्या इनसिडियस या मालिकेती चौथा चित्रपट तयार झाला आहे. Insidious: The Last Key असे या चित्रपटाचे नाव आहे. भयपटांच्या मालिकेतील पहिले तिन्ही चित्रपट लोकांना खूप आवडले होते. ‘द लास्ट की’ मध्ये डॉ.एलिस रेनियरची भूमिका लिन शाय पार पाडणार आहे. या चित्रपटात ते पॅरासायकॉलॉजिस्टच्या भूमिकेत आहेत. त्यांच्याच घराला धोका निर्माण झाला आहे. भूत-प्रेतांची नजर त्यांच्याच परिवारावर असल्याचे या चित्रपटात दाखण्यात आले आहे. या अगोदरच्या भागात इतर लोकांना भूत-प्रेतांपासून वाचवले आहे. आता स्वत:च्याच लोकांना त्यांना वाचवायचे आहे.