Dharma Sangrah

सलमान खानबद्दलच्या 'या' 9 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

Updated: शुक्रवार, 27 डिसेंबर 2019 (17:15 IST)
 
याविषयी अभिनेत्री करिना कपूरनं म्हटलं होतं, "सलमान खाननं सिक्स पॅक अॅब्सचा ट्रेंड बॉलीवूडमध्ये सुरू केला. मला वाटतं आता सगळे कलाकार बॉडी बिल्डिंगच्या मागे लागले आहेत. 6 किंवा 8 पॅक अॅब्स असावेतच, असं काही नाही. पण चित्रपट क्षेत्रात तुम्ही कसे दिसता, हे खूप महत्त्वाचं असतं."
 
सलमान खाननं बॉली बिल्डिंगसाठी अर्जून कपूरला मदत केल्याचं सांगितलं जातं. सुरुवातीच्या काळात सलमान खानसोबत तो वर्क आऊट करायचा. सलमान खानमुळेच मी बॉडी बिल्डिंगसाठी प्रेरित झालो, असं तो सांगतो. केवळ अर्जुन कपूरच नाही, तर सोनाक्षी सिन्हा, वरुण धवन यांनाही सलमान खाननंच वर्क आऊटसाठी मदत केली होती.
 
4. अनेक गर्लफ्रेंड्स, पण अजूनही अविवाहित
सलमान खानच्या लग्नाविषयीच्या बातम्या सतत माध्यमांमध्ये येत असतात. आतापर्यंत सलमानच्या अनेक गर्लफ्रेंड्सही झाल्या आहेत.
 
अगदी सुरुवातीच्या काळात अभिनेत्री संगीता बिजलानी यांच्यासोबत त्याच्या लग्नाची तारीख निश्चित झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यानंतर ऐश्वर्या राय, कॅटरिना कैफ, झरिन खान अशा अनेक अभिनेत्रीसोंबत त्याचं नाव जोडलं गेलं.
 
लग्नाविषयीच्या एका प्रश्नावर इंडिया टीव्हीच्या कार्यक्रमात त्यानं सांगितलं, "लग्न होईल, असं खूप पूर्वी वाटलं होतं, पण मी त्यातून वाचलो. आता अशी वेळ आली आहे की, मुंबई आणि जोधपूरचं प्रकरण न्यायलयात आहे. या प्रकरणांत मला शिक्षा मिळाली आणि माझं लग्न झालं असतं तर? ही प्रकरणं निकाली निघाल्यानंतर लग्नाचा विचार करू."
 
5. बॉलिवूडमध्ये अनेकांना ब्रेक
सलमान खाननं अनेक कलाकारांना बॉलीवूडमध्ये ब्रेक दिला आहे. यामध्ये संगीतकार हिमेश रेशमिया, अभिनेता सूरज पांचोली, अथिया शेट्टी, सोनाक्षी सिन्हा, झरीन खान...सलमाननं लाँच केलेल्या कलाकारांची यादी बरीच मोठी आहे.
 
सध्या सलमाननं लाँच केलेला नवा चेहरा म्हणजे महेश मांजरेकर यांची कन्या सई मांजरेकर. 'दबंग 3' मधून सई बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. सोनाक्षी सिन्हानं 'दबंग' या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
 
नुकत्यात प्रदर्शित झालेल्या दबंग-3 या चित्रपटाबद्दल तिनं म्हटलं होतं, "मी आज जे काही आहे, ते फक्त 'दबंग'मुळे आहे, सलमान खानमुळे आहे. त्यांनी मला रज्जो बनवलं आणि तिथून मग माझा प्रवास सुरू झाला."
 
असं असलं तरी, बॉलीवूडमधल्या ज्या कलाकारांसोबत सलमानचे वाद झाले आहेत, त्यांची यादीही काही कमी मोठी नाही. अगदी शाहरुख खानपासून विवेक ओबेरॉय, अरिजित सिंग, सोना मोहपात्रा अशा अनेकांचं सलमानसोबत कोणत्या ना कोणत्या कारणावरून बिनसलं होतं.
 
2003मध्ये विवेक ओबेरॉयनं एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्यानं म्हटलं होतं, "सलमान मध्यरात्री दारू पिऊन आला, मला शिवीगाळ केली आणि मारायची धमकी दिली."
 
या पत्रकार परिषदेमुळे विवेक ओबेरॉच्या कारकिर्दीला ब्रेक लागल्याचं म्हटलं जातं. विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय यांच्या प्रेमप्रकरणाच्या बातम्या येत होत्या, त्यादरम्यान विवेकनं हा आरोप केला होता.
 
6. हिट अँड रन प्रकरण
28 सप्टेंबर 2002च्या रात्री वांद्रे परिसरात सलमानच्या गाडीनं फुटपाथवरील 5 जणांना चिरडलं होतं. या अपघातात एकाचा मृत्यू झाला. सलमानवर मद्यपान करून गाडी चालवल्याचा आरोप आहे. पण, सलमाननं हे आरोप फेटाळले आहेत.
 
6 मे 2015ला मुंबई सत्र न्यायालयानं सलमानला याप्रकरणी 5 वर्षांचा सश्रम कारावास आणि 25 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. याच दिवशी संध्याकाळी हायकोर्टानं त्याला दोन दिवसांचा जामीन मंजूर केला. त्यानंतर 8 मेला हायकोर्टानं सलमानच्या 5 वर्षांच्या शिक्षेला स्थगिती दिली.
 
7. काळवीट शिकार प्रकरण
चित्रपट 'हम साथ साथ है'च्या चित्रिकरणादरम्यान सप्टेंबर-ऑक्टोबर 1998 कालावधीत सलमानसह इतर कलाकारांवरही आरोप होते. सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि नीलम यांच्यावर काळवीटच्या शिकारीसाठी सलमानला प्रवृत्त केल्याचा आरोप होता.
 
काळवीट शिकारप्रकरणी सलमान खानवर चार गुन्हे दाखल करण्यात आले. मथानिया आणि भवाद या ठिकाणी काळविटांच्या शिकाराची दोन स्वतंत्र प्रकरणं, कांकाणीमध्ये हरणांची शिकार प्रकरण आणि लायसन्स संपल्यानंतरही रायफल बाळगल्याचा (आर्म्स अॅक्ट) आरोप सलमानवर आहे.
 
काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानला जोधपूर न्यायालयानं 2018 मध्ये सलमान खानला दोषी ठरवलं होतं. त्याला 5 वर्षांची शिक्षाही सुनावली होती. नंतर 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सलमानला सोडण्यात आलं.
 
8. बीईंग ह्यूमनच्या माध्यमातून समाजकार्य
सलमान खाननं 2007मध्ये 'बीईंग ह्यूमन' नावाची संस्था सुरू केली. त्या माध्यमातून तो तळागाळातल्या लोकांसाठी शिक्षण आणि आरोग्यसुविधा पुरवण्याचं काम करतोय, असं या संस्थेच्या वेबसाईटवर म्हटलं आहे.
 
तसंच 2013 मध्ये महाराष्ट्रातील दुष्काळात मदतीचं काम केल्याचंही संस्थेनं म्हटलं आहे. 2013मध्ये 'बीईंग ह्यूमन' संस्थेनं राज्यातल्या बीड, उस्मानाबाद, जालना, औरंगाबाद आणि नांदेड या 5 जिल्ह्यांमध्ये 2000 लीटर क्षमता असलेल्या 2500 पाण्याच्या टँकचं वाटप केलं होतं. असं असलं तरी, सलमाननं त्याच्या या सामाजिक कामाचा वापर त्याच्याविरोधातील गुन्ह्याच्या खटल्यांमधून बाहेर पडण्यासाठी केला, असा आरोपही करण्यात आला आहे.
 
9. वडिलांची साथ
'जेव्हा-केव्हा मी चुकलो, तेव्हा माझ्या वडिलांनी (सलीम खान) मला समजावून सांगितलं. ते माझे सगळ्यात मोठे टीकाकार आहेत आणि मला त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्यायची असते, कारण ते प्रामाणिक आहेत, असं सलमाननं एकदा म्हटलं होतं. 1993मधील मुंबईतील बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपी याकूब मेमन याच्या समर्थनाथ ट्वीट केल्यानंतर सलमान खानवर प्रचंड टीका झाली होती.
 
सलमानचं ट्वीट म्हणजे मूर्खपणा आहे आणि त्याला काहीही अर्थ नाही. सलमाननं त्याच्या चित्रपटांवर लक्ष केंद्रित करायला हवं, असं ट्वीट सलीम खान यांनी केलं होतं. यानंतर सलमाननं माफी मागत यावर स्पष्टीकरण दिलं होतं.

सर्व पहा

'नयी नवेली'चा धमाकेदार टीझर प्रदर्शित, यामी गौतमचा आतापर्यंतचा सर्वात अनोखा अवतार समोर आला

'हनुमान अंश' चित्रपटादरम्यान थिएटरमधील सीट क्रमांक ९ रिकामा का ठेवला जात आहे? यामागील रहस्य जाणून घ्या

'हनुमान अंश २' मध्ये विराट आणि अनुष्का दिसणार? नीम करोली बाबांवर आधारित चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल मोठा संकेत

सूर्यास्तानंतर जंगलात प्रवेशास बंदी! ४०० वर्षे जुन्या 'वन देवी' मंदिराच्या दंतकथेवर आधारित तमन्ना भाटियाचे 'व्वाण' चित्रपट?

'दृश्यम द कन्क्लुजन'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, जयदीप अहलावत अजय देवगणच्या विरुद्ध भूमिकेत

सर्व पहा

सर्वोच्च न्यायालयाने राजपाल यादव यांना तात्काळ २ कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले

अभिनेत्री भाग्यश्री यांच्या आरतीनंतर सांगलीच्या राजघराण्यात नवा वाद! वडिलांनी केला गंभीर आरोप!

प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक आणि दिग्दर्शक गणेश आचार्य यांनी 'गणेश डस्ट टू स्टारडस्ट' या नवीन चित्रपटाची घोषणा केली

गायकाने परदेशी लोकांची मने जिंकली, वेंबली स्टेडियममध्ये टेलर स्विफ्टचा विक्रम मोडला

ज्ञान व बुद्धीचा अधिपती मोरगावचा मोरेश्वर, महादेवांचा नंदी इथं मयूरेश्वराच्या मंदिराबाहेर

पुढील लेख