रविवार, 8 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 13 जानेवारी 2018 (09:51 IST)

काजोल आणि राणी मुखर्जी पाहुण्या कलाकराच्या भूमिकेत दिसणार

पुन्हा एकदा काजोल शाहरुखसोबत झळकणार आहे. आनंद एल राय दिग्दर्शित ‘झिरो’ या किंग खानच्या आगामी चित्रपटात काजोलचीही भूमिका आहे.‘झिरो’मध्ये किंग खानसोबत कतरिना आणि अनुष्का शर्मा मुख्य भूमिका साकारणार आहेत. तर काजोल आणि राणी मुखर्जी पाहुण्या कलाकराच्या भूमिकेत पाहायला मिळतील. राणीने शूटिंगचा अनुभव व्यक्त करताना ‘कुछ कुछ होता है २’साठी काम केल्यासारखे वाटल्याचे सांगितले. तर ‘आम्ही जवळपास अर्ध्या तासासाठी शूटिंग केले. पण शाहरुखसोबत काम करण्याचा अनुभव नेहमीच निराळा असतो,’ असे काजोलने म्हटले. ‘ २१ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.