1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020 (11:15 IST)

कावेरी अम्मासाठी शाहरुखची भावनिक पोस्ट

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री किशोरी बलाल यांचं निधन झालं. गेल्या कित्येक दिवसापासून त्या आजारी होत्या. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आम्हाला तुमची कायम आठवण येईल. मी धू्म्रपान करायचो तयावेळी ज्या प्रकारे त्या मला ओरडायच्या तो क्षण फार आठवेल. अशा आशयाचे ट्विट करुन शाहरुखने किशोरी बलाल यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

यापूर्वी चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनीदेखील त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. किशोरी बलाल यांच्या निधनामुळे प्रचंड दुःख होत आहे , अशी पोस्ट आशुतोष गोवारीकर यांनी शेअर केली.