मंगळवार, 13 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

स्टंट करताना दोन कन्नड अभिनेते बेपत्ता

कन्नड चित्रपटात दोन कन्नड स्टंटबाज उदय आणि अनिल बेपत्ता
बंगळूरू- कन्नड चित्रपटातील स्टंटबाजी दोन कन्नड अभिनेत्यांवर जीवावर बेतल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. हेलिकॉप्टरमधून तलावात उडी मारण्याच्या सीननंतर उदय आणि अनिल हे दोन अभिनेते बेपत्ता झाले आहेत. 
 
बंगळूरूच्या पश्चिम भागातील मागदी रोडवर असलेल्या तिप्पागोंदानहल्ली तलावात मस्ती गुडी या कन्नड चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. विजय, अनिल आणि उदय या तीन अभिनेत्यांनी हेलिकॉप्टरमधून तलावात उडी मारली. विजयने पोहून तलावाचा किनारा गाठला, मात्र अनिल आणि उदय या अभिनेत्यांचा थांगपत्ता लागलेला नाही.
 
विजय या एकाच अभिनेत्याला सेफ्टी हार्नेस वापरल्याचे प्रत्यक्षदारशींनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे शूटिंगच्या वेळी अॅम्ब्युलन्स किंवा स्पीड बोट्स नसल्याचाही दावा केला जात आहे. मस्ती गुडी चित्रपटाच्या युनिट विरोधात केस दाखल करण्यात येणार असल्याचीही माहिती आहे.