Dharma Sangrah

कार्तिकही करणार नाही राकेश शर्मावरील बायोपिक

सोमवार, 11 फेब्रुवारी 2019 (14:33 IST)
भारतातील पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या जीवनावर आधारित बनणारा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आहे. आतापर्यंत चर्चा होती की, या चित्रपटासाठी कार्तिक आर्यनबरोबर बोलणे सुरू आहे, परंतु कार्तिकने हे वृत्त चुकीचे असल्याचे सांगतानाच आपण राकेश शर्मा यांच्या चित्रपटाचा हिस्सा नसल्याचे स्पष्ट केले आहे. भारतातील पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांच्यावर बनणारा बायोपिक गेल्या काही काळापासून चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाची चर्चा यामध्ये शाहरूख खान येणार असल्याची बामती आल्यानंतर जास्तच वाढली होती. झीरो चित्रपटादरम्यान शाहरूख चित्रपटाविषयी भरभरून बोलत होता, परंतु झीरोच्या अपयशानंतर शाहरूख कोणताही नवा प्रयोग करण्यास इच्छुक नाही. त्यामुळे यापुढे ज्या चित्रपटाच्या यशाविषयी त्याला पूर्ण खात्री वाटेल त्याच प्रोजेक्टचा हिस्सा बनण्याचे शाहरूखने ठरवले आहे. राकेश शर्मांच्या या बायोपिकची ऑफर सर्वात आधी आमिर खानला देण्यात आली होती. आमिरने या कथेविषयी शाहरूखबरोबर चर्चा केली. आमिरचे ऐकून शाहरूख या चित्रपटात काम  करण्यास तयारही झाला होता. शाहरूख चित्रपटातून बाहेर पडल्यानंतर या चित्रपटासाठी कार्तिक आर्यनच्या नावाचीही जोरदार चर्चा झाली. या दरम्यान या चित्रपटासाठी विक्की कौशलचे नावही पुढे आले होते, परंतु आता कार्तिकने आपण या चित्रपटाचा हिस्सा नसल्याचे स्पष्ट केले आहे. कार्तिक म्हणाला, प्रदीर्घ काळापासून मी ऐकत आहे की, मी कुठल्या तरी स्पेस फिल्ममध्ये काम करणार आहे, जे मुळात खरे नाही. काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक महेश थाई यांनी कार्तिक आर्यनबरोबर चर्चा देखील केली होती.

सर्व पहा

कॉकटेल २ चित्रपट समीक्षा: सुंदर वेष्टनात सादर केलेली एक कमकुवत प्रेमकथा

साधेपणाचे एक उदाहरण: सुनील ग्रोव्हर ऋषिकेशमध्ये फूटपाथवर चादर पसरून झोपले

'देऊळ बंद २' या मराठी चित्रपटाचे ४२ लाख रुपयांचे बिल शाहरुख खानने माफ केले; चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला

3 इडियट्स'च्या सिक्वेलबद्दल मोठी बातमी, राजकुमार हिरानी यांनी कथेचे गुपित उघड केले

'वेलकम टू द जंगल'मध्ये नवीन गाणे प्रदर्शित, अमृता फडणवीस यांच्या आवाजाने 'दिवाने हैं' हा सुपरहिट ट्रॅक झाला

सर्व पहा

अभिनेते प्रकाश राज यांनी पुन्हा एकदा कॉकरोच जनता पक्षाला पाठिंबा देणारे मोठे वक्तव्य केले

उर्फी जावेदने इस्लाम सोडून हिंदू धर्म स्वीकारला ? अंगप्रदर्शन करणाऱ्या कपड्यांबाबत अभिनेत्रीने मौन सोडले

इम्रान हाश्मीच्या 'आवारापन २' चा वेदना आणि अॅक्शनने भरलेला टीझर प्रदर्शित

तलवारीच्या आकाराची विहीर दातेगड पाटण सातारा; स्थापत्यशास्त्राचा अप्रतिम नमुना

श्रद्धा कपूरचा 'इठा' चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादात सापडला; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांची मोठी मागणी

पुढील लेख
Show comments