अक्षय- करण ‘केसरी’ ची निर्मिती करणार
अभिनेता अक्षयकुमार आणखी एका नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. सारगढी युद्धावर आधारित असणाऱ्या या सिनेमाचं नाव ‘केसरी’ असणार आहे. या सिनेमाची निर्मिती अक्षय कुमार आणि करण जोहर दोघे मिळून करणार आहेत. 2019 मध्ये होळीच्या मुहूर्तावर हा सिनेमा रिलीज होणार आहे.
अक्षयकुमार आणि करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने या सिनेमाविषयी सोशल मीडियावरुन माहिती दिली आहे.या सिनेमाच्या निर्मितीमध्ये अभिनेता सलमान खानचाही सहभाग असणार होता. मात्र सलमानने यातून माघार घेतली आहे. यावर्षी जानेवारीतच
सलमानने याबाबत स्वतः माहिती दिली होती.अक्षय कुमार सध्या गोल्ड या त्याच्या आगामी सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. शिवाय 2.0 या रजनीकांत आणि अक्षय कुमार यांच्या सिनेमाच्या निर्मितीचं कामही सध्या सुरु आहे.
याशिवाय अक्षयकुमार 2018 मध्ये 2.0, गोल्ड, पद्मन, फाईव्ह, मोगुल आणि क्रॅक या सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.