Festival Posters

चांगल्या चित्रपटांच्या ऑफर्स आल्या नाहीत

मंगळवार, 18 जून 2019 (10:41 IST)
समाजातील गोष्टींवर निर्भीडपणे आपलं मत मांडणार्‍या कलाकारांमध्ये अभिनेत्री कोंकणा सेन शर्माचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं. 'लिप्स्टीक अंडर माय बुरखा'सारख्या चित्रपटामध्ये तिने काम केलं आहे. आतापर्यंत तिने अनेक चित्रपटांमध्ये बोल्ड भूमिका केल्या आहेत. त्यामुळे कलाविश्र्वामध्ये तिची कायम चर्चा असते. मात्र सध्या तिने केलेल्या एका वक्तव्यामुळे तिची चर्चा रंगली आहे. 'माझ्या वाट्याला कधीच चांगल्या चित्रपटांच्या ऑफर्स आल्या नाहीत', अशी खंत तिने व्यक्त केली आहे. कोंकणाने 'ए मॉन्सून डेट' या चित्रपटात एका ट्रान्सजेंडरची भूमिका साकारली आहे. या भूमिकेबाबत बोलताना तिने तिची खंतही व्यक्त केली आहे. 'डीएनए'च्या माहितीनुसार, यापूर्वी मी अशी व्यक्तिरेखा कधीच साकारली नाही. या चित्रपटाच्या निमित्ताने मला वेगळ्या धाटणीची भूमिका साकारण्याची संधी मिळत आहे. ही खरंच माझ्यासाठी फार मोठी बाब आहे. पहिल्यांदाच मला अशी महत्त्वाची आणि चांगल्या चित्रपटाची ऑफर आली आहे, यापूर्वी मला कधीच अशा चांगल्या चित्रपटांच्या ऑफर्स आल्या नव्हत्या. पुढे ती म्हणते, मला चांगल्या ऑफर्स आल्या नाहीत. मात्र, या चित्रपटांच्या माध्यमातून मला कलाविश्र्वातील दिग्गज व्यक्तींसोबत काम करण्याची संधीदेखील मिळाली. त्यामुळे मी स्वतःला लकी असल्याचं मानते. मात्र 'तलवार' आणि 'लिप्स्टीक अंडर माय बुरखा'सारखे चांगले चित्रपटही मला मिळाले. दरम्यान, 'ट्रॅफिक सिग्नल', 'मिक्सड डबल्स', 'आजा नचले' आणि 'गौर हरि दास्तान' या चित्रपटांमध्ये कोंकणा झळकली असून ती लवकरच 'डॉली किट्टी और वो चमकते सितारे' या चित्रपटात झळकणार आहे.

सर्व पहा

72nd National Film Awards: 'आर्टिकल ३७०' ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा, तर कार्तिक आर्यन आणि ममूटी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला

कार्तिक आर्यनला त्याचा पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला; कुटुंबासोबत विजयाचा आनंद साजरा केला

रणबीर कपूरच्या 'रामायण'चा ट्रेलर लीक, यशचा रावणाचा अवतारही दिसला

जान्हवी कपूरला एक नवीन चित्रपट मिळाला, या दिग्दर्शकासोबत काम करणार

सनी देओलच्या 'पार्टिशन १९४७' चा टीझर प्रदर्शित; फाळणीची हृदयद्रावक कथा अंगावर काटा आणेल

सर्व पहा

शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी: बॉलिवूडच्या कलाकारांनी विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवला

83 वर्षीय अमिताभ बच्चन यांच्यावर शस्त्रक्रिया झाली? ICU मध्ये दाखल, बिग बींच्या प्रकृतीबाबत समोर आली महत्त्वाची माहिती

राजस्थान रॉयल्सच्या वादाप्रकरणी इंग्लंड न्यायालयाने राज कुंद्राला नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले

विजयच्या 'जना नायगन'चा नवा टीझर प्रदर्शित झाला

महाराष्ट्रातील अशी 7 ठिकाणं जिथे पावसाळ्यात जाणं म्हणजे स्वर्गाचा अनुभव

पुढील लेख
Show comments