suvichar

कृतीला करायचेय टायगरबरोबर काम

मंगळवार, 3 जुलै 2018 (12:43 IST)
आपला पहिलाच चित्रपट हीरोपंतीद्वारेच टायगर श्रॉफने लोकांच्या मनामध्ये आपली जागा प्रस्थापित केली होती. बागी-2 च्या ऐतिहासिक यशानंतर टायगरच्या चाहत्यांची संख्या अचानक वाढली आहे. टायगरच्या याच लोकप्रियतेचा लाभ आता मोठे बॅनर घेऊ पाहत आहेत. हेच कारण आहे की, टायगर आता आदित्य चोप्रांच्या यश राज फिल्म्स व करण जौहरच्या बॅनर धर्मा प्रोडक्शन्सचे चित्रपट करत आहे. याशिवाय त्याच्याकडे रेम्बोचा रिमेकदेखील आहे ज्यामध्ये हॉलिवूड स्टार सिल्व्हेस्टर स्टेलॉन यांची व्यक्तिरेखा तो साकारणार आहे. टायगरबरोबर आता बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींना चित्रपटकरण्याची इच्छा आहे. अलीकडेच एका हॉट अभिनेत्रीने आपण टायगरबरोबर चित्रपट करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. या अभिनेत्रीचे नाव आहे कृती सेनन. कृती व टायगरने आपले करिअर एकाच चित्रपटाद्वारे हिरोपंतीद्वारे सुरु केले होते व दोघांनी बॉलिवूडमध्ये आपले स्थानही निर्माण केले. कृतीच्या म्हणण्यानुसार, टायगर हा अतिशय लाजाळू व साधा माणूस आहे. तो कधीच कुणाला त्रास देत नाही. त्याच्याबरोबर पहिला चित्रपट करताना खूप मजा आली, असेही कृतीने म्हटले आहे. टायगरची बागी मालिका ही खूपच हिट ठरली. पहिल्या बागीमध्ये त्याने श्रद्धा कपूरबरोबर काम केले, तर दुसर्‍या बागीध्ये तो दिशा पाटनीबरोबर दिसून आला. आता बागी-3 मध्ये टायगरबरोबर काम करण्याची इच्छा कृतीने व्यक्त केली आहे. तिला या चित्रपटात टायगरबरोबर अ‍ॅक्शनची धमाल करायची इच्छा आहे.

सर्व पहा

करण जोहरने इन्स्टाग्रामवर शाहरुख खान आणि आलिया भट्ट यांच्यासह अनेक सेलिब्रिटींना अनफॉलो केले

"द पिरॅमिड स्कीम" ट्रेलर प्रदर्शित: झटपट श्रीमंत होण्याच्या लोभाची एक धोकादायक कहाणी

मास्टरशेफ इंडियाचा विजेता पंकज भदौरियाला ब्रेस्ट कॅन्सरचे निदान

बॉबी देओलने यशराज फिल्म्सच्या अल्फा या चित्रपटाच्या शूटिंगचा अनुभव सांगितला

मनोज बाजपेयी यांच्या आगामी 'गव्हर्नर' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला

सर्व पहा

सलमान खानने 'काला हिरण'च्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठवली

अभिनेत्री रवीना टंडनच्या आईच्या घरी मोठी चोरी झाली

वरुण धवनला दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, एआय आणि डीपफेकच्या वापरावर बंदी

सुंदर अशी हिरवागार दरी; पावसाळ्यातील विहंगमय सापुतारा: नक्कीच ट्रिप प्लॅन करा

'अल्फा'च्या सेटवर आलिया भट्टसोबत मतभेद झाल्याच्या वृत्तांवर बॉबी देओलने मौन सोडले

पुढील लेख
Show comments