सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

त्यावेळी माझ्या मागे कोणी उभे राहिले नाही : भंडारकर

‘पद्मावती’वर जशी वेळ आली होती, तशीच वेळ माझ्यावर ‘इंदू सरकार’वर आली होती. पण त्यावेळी माझ्या मागे कोणी उभे राहिले नाहीत. फिल्म इंडस्ट्री ही आपमतलबी आहे, स्वतःवर संकट आले की सगळ्यांनी आपल्या मागे उभे रहावे असे प्रत्येकाला वाटत असते अशा शब्दात दिग्दर्शक-निर्माते मधुर भंडारकर यांनी  प्रतिक्रिया व्यक्त  केली आहे. 
 
जेव्हा एखादा निर्माता एवढी मेहनत घेऊन चित्रपट बनवतो. तेव्हा तो प्रदर्शित व्हायला हवा. ‘पद्मावती’सुद्धा प्रदर्शित व्हायला हवा. सध्या हे प्रकरण सीबीएफसीकडे असून त्याची सूत्र प्रसून जोशी यांच्यासारख्या जाणकार व्यक्तीकडे असल्याने ते यातून निश्चितच समाधानकारक मार्ग काढतील, अशी अपेक्षा भंडारकर यांनी यावेळी व्यक्त केली.