मिर्झापूर 3 ची पहिली झलक प्रदर्शित
चाहते मिर्झापूर 3 च्या पहिल्या झलकची वाट पाहत आहेत आणि या मालिकेची पुढील कथा आणि कालिन भैय्याचे पात्र पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. आणि आता चाहत्यांची प्रतीक्षा संपवत प्राइम व्हिडीओने चाहत्यांना मिर्झापूर 3 ची पहिली झलक दिली आहे. प्राइम व्हिडिओच्या #AreYouReady इव्हेंटमध्ये याची घोषणा करण्यात आली होती,हा #AreYouReady इव्हेंट मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता
यावेळी प्राइम व्हिडिओने 70 चित्रपट आणि मालिकांची घोषणा केली होती.त्यामध्ये 'मिर्झापूर 3'चाही समावेश होता.
या मालिकेचा पहिला सीझन 2018 मध्ये आणि दुसरा सीझन 2020 मध्ये रिलीज झाला होता. मात्र, तिसऱ्या सीझनसाठी चाहत्यांना बराच काळ वाट पाहावी लागली आहे. आता निर्मात्यांनी त्याच्या तिसऱ्या सीझनची पहिली झलक दाखवली आहे.
प्राइम व्हिडिओच्या या लेटेस्ट व्हिडिओमध्ये पंकज त्रिपाठी म्हणजेच कालिन भैय्याची झलक दाखवण्यात आली आहे. धबधब्याच्या काठी उभं राहून कलेन भैया म्हणतो, "तू आम्हाला विसरला नाहीस." अली फजल, श्वेता त्रिपाठी, रसिका दुग्गल, विजय वर्मा आणि ईशा तलवार यांसारख्या कलाकारांची झलकही व्हिडिओमध्ये दाखवण्यात आली आहे. 'मिर्झापूर'चा सीझन 3 दमदार असणार आहे हे या छोट्या व्हिडिओवरून स्पष्ट होत आहे. यावेळी मालिकेची कथा मनाला भिडणारी असू शकते.
Edited by - Priya Dixit