बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मुंबई , शनिवार, 9 जून 2018 (11:30 IST)

प्रियंका ‘क्रिश-4’मध्येही कायमच

राकेश रोशन परिवाराचा ‘क्रिश’हा सुपरहीरो टाइपचा सिनेमा सुपरहीट झाल्यावर रोशन बापबेट्याने त्याची मालिकाच सुरू केलाय. या सिनेमाचे आतापर्यंत तीन भाग रिलीज झाले. राकेश रोशन आणि ऋतिक रोशन या सिनेमाचा पुढचा भाग कधी आणतात याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलंय.
 
याबाबत राकेश रोशन म्हणाले की, या सिनेमाचा पहिला भाग बनवला तेव्हा आम्हाला नवीन मुलगी हवी होती. त्यावेळी मी एका नव्या मुलीला भेटलोही होतो. तो सिनेमा उशीरा बनणार होता. पण तरीही मला सक्षम अभिनेत्री हवी होती. प्रियंका चोप्राला मी तेव्हा भेटलो. त्यावेळी तिने नुकताच मिस वर्ल्ड मुकूट जिंकला होता. पण तिला बघतात ती परफेक्ट कास्ट ठरेल ही आधीच खात्री वाटली. मग काम करताना तिची क्षमता पाहिली तेव्हा वाटलंच होतं की ही मुलगी हॉलीवूडला जाणार… तसंच झालंही. त्यामुळे माझ्या चौथ्या आणि पाचव्या भागाचीही ती हिस्सा बनेल एवढंच आत्ता सांगू शकेन, असं ते म्हणाले.