रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 7 एप्रिल 2018 (15:58 IST)

रजनीकांत यांच्या 'काला' ला १४ कटसह यू/ए सर्टिफिकेट

रजनीकांत यांच्या आगामी काला सिनेमाला  सेन्सॉर बोर्डाने सिनेमाला १४ कटसह यू/ए सर्टिफिकेट देऊन सिनेमाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदिल दाखवला. सिनेसमिक्षक क्रिटिक श्रीधर पिलाई यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन यांनी ही माहिती दिली. या सिनेमात रजनीकांत, नाना पाटेकर आणि हुमा कुरेशी यांच्या मुख्य भूमिका आहेत.

श्रीधर यांच्या ट्विटनुसार, कालाचे प्रदर्शन पुढे ढकलले जाणार अशी अफवा होती. पण रजनकांत यांच्या काला सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने यू/ए प्रमाणपत्र दिले असून सिनेमातील १४ दृश्यांवर कैची लावली आहे. येत्या २७ एप्रिलला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात एका अशा माणसाची कथा सांगण्यात आली आहे की, जो तिरुनेलवेलीहून (तमिळनाडू) पळून मुंबईत येतो आणि धारावीमधील एक डॉन होतो.