शनिवार, 23 सप्टेंबर 2023
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 7 सप्टेंबर 2022 (12:31 IST)

Ranbir-Alia महाकालचे दर्शन न करता रणबीर-आलिया परतले, गोमांसाच्या वक्तव्याचा हिंदू संघटनांचा निषेध

फिल्मस्टार आणि बॉलिवूडचे प्रसिद्ध जोडपे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मंगळवारी संध्याकाळी महाकाल मंदिराच्या दर्शनासाठी उज्जैनला पोहोचले.त्यांचे येथे आगमन होण्यापूर्वीच बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखविण्याच्या उद्देशाने महाकाल मंदिराच्या प्रवेशद्वारावर गोंधळ घातला.
 
 यादरम्यान बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीही झाली.या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला.बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, रणबीर कपूरने स्वत: बीफ खातो असे सांगितले आहे.अशा परिस्थितीत गोमांस खाणाऱ्यांना मंदिरात प्रवेश कसा दिला जात आहे.या घटनेची माहिती मिळताच रणबीर, आलिया आणि अयान मुखर्जी उज्जैनचे जिल्हाधिकारी आशिष सिंह यांच्या घरी पोहोचले.
 
आधीच व्हिडीओ व्हायरल झाल्याची माहिती
रणवीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ जारी करून ते उज्जैन महाकालच्या दरबारात जात असल्याचे सांगितले होते.रणबीर आणि आलियासोबत दिग्दर्शक अयान मुखर्जीही होता.संध्याकाळी 6.30 च्या सुमारास इंदूर विमानतळावर उतरले आणि उज्जैनला रवाना झाले.दोघेही त्यांच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येथे आले होते.दोघांनी यावर्षी एप्रिलमध्ये लग्न केल्याची माहिती आहे.