रविवार, 4 डिसेंबर 2022
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified शुक्रवार, 29 जानेवारी 2021 (17:04 IST)

'सत्यमेव जयते 2' ची रिलीज डेट आऊट

जॉन अब्राहमचा ‘स्तयमेव जयते' प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. याच चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. मिलन झवेरी दिग्दर्शित ‘सत्यमेव जयते 2' चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. ‘सत्यमेव जयते 2 चित्रपटातील लीड हिरो जॉन अब्राहमचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यामत आला होता. चित्रपटाच्या पोस्टर्सवर जॉनचा दमदार अवतार दिसून येत असून, जिस देश की मैया गंगा है.., वहा खून भी तिरंगा है' अशी टॅग लाइनसुद्धा देण्याअत आली आहे. यातच आता जॉनने इन्स्टाग्रामवर चित्रपटाची डेट रिलीज केली आहे. ‘सत्यमेव जयते 2' 14 मे 2021 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
 
याचा सिक्वल ऑक्टोबर 2020 मध्ये प्रदर्शित करण्यालत येणार होता. 2018 मध्ये रिलीज झालेल्या सत्यमेव जयतेचे बजेट फक्त 45 कोटी रुपये होते. तर चित्रपटाची कमाई 88 कोटी रुपये होती. ‘सत्यमेव जयते 2' या चित्रपटासाठी जॉन अब्राहमने खास ट्रेनिंग घेतल्याचे कळते. या चित्रपटात जॉनसोबत अभिनेता मनोज बाजपेयी, दिव्या खोसला कुमार, अनुप सोनी, हर्ष छाया हेदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.