शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2022
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified गुरूवार, 14 जानेवारी 2021 (14:55 IST)

विकी बनणार ‘अश्वत्थामा'

सिनेमांमध्ये छोट्या-छोट्या भूमिकांमधून स्वतःच्या अभिनाची चुणूक दाखवत विकी कौशलने अल्पावधीतच  बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. उरी घटनेवर आधारित त्याच्या सिनेमाने तर बॉक्स ऑफिसवर कमाईचा विक्रम केला होता. विकी कौशल आता एका वेगळ्या म्हणजेच ‘अश्वत्थामा'च्या भूमिकेत दिसणार असून हा सिनेमाचे नाव जरी पौराणिक असले तरी आधुनिक म्हणजेच हाय-फाय सिनेमा आहे. हा सिनेमाही ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक' ज्यांनी बनवला तीच टीम बनवत आहे.
 
या सिनोबाबत बोलताना दिग्दर्शक आदित्य धरने सांगितले, आमच्या उरी सिनेमाला प्रेक्षकांचे खूपच प्रेम मिळाले   होते. त्यामुळे प्रेक्षकांच्या कसोटीवर उतरत काही तरी चांगले देण्याबाबत आम्ही विचार करीत होतो. त्यातूनच हा आगळावेगळा सिनेमा आकाराला आला आहे. ‘अश्वत्थामा'त असे स्पेशल इफेक्ट्‌स दाखवणार आहोत जे भारतीय प्रेक्षकांनी यापूर्वीही कधीही पाहिलेले नाहीत. भारतीय प्रेक्षकांसाठी हा सिनेमा म्हणजे केवळ एक सिनेमा नव्हे तर एक अनुभव ठरणार असल्याचे सांगितले. विकीनेही या सिनोबाबत बोलताना सांगितले, हा सिनेमा माझ्या  आतापर्यंतच्या सिनेमांपैकी सगळ्यात भव्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाने तयार केला जाणारा सिनेमा आहे.