Biodata Maker marathi
✕

सचिन तेंडुलकरची मुलगी साराने मॉडेलिंगच्या दुनियेत पाऊल ठेवले, अप्रतिम दिसत आहे VIDEO

Updated: मंगळवार, 7 डिसेंबर 2021 (13:59 IST)
 
सारा तेंडुलकरअलीकडेच एका लोकप्रिय कपड्यांच्या ब्रँडशी करार केला आहे. या कपड्यांच्या ब्रँडचा प्रचार करण्यासाठी तिने बनिता संधू आणि तानिया श्रॉफ या अभिनेत्रींसोबत मॉडेलिंगमध्ये पदार्पण केले. प्रमोशनल व्हिडिओमध्ये हे तिघे एकत्र पोज देताना दिसत आहेत. सारा काही काळ तिच्या जिमचे व्हिडिओही पोस्ट करत होती. अशा परिस्थितीत ती तिच्या मॉडेलिंग करिअरसाठी पूर्णपणे तयार होत असल्याचे दिसते.  
 
तिने आता मॉडेलिंगच्या क्षेत्रात एंट्री केली असून चाहते खूप उत्सुक आहेत. साराने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर तिच्या पहिल्या जाहिरातीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे आणि त्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. सारा तेंडुलकर इंस्टाग्रामवर खूप सक्रिय आहे आणि तिचे 1.5 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.
 
 
सारा तेंडुलकर इंस्टाग्रामवर कधी पारंपारिक तर कधी मॉडर्न स्टाईलमध्ये तिचे फोटो शेअर करत असते आणि चाहत्यांनाही ती खूप आवडते.
 
सारा तेंडुलकरने तिचे शालेय शिक्षण मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून केले आणि युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनची पदवीधर आहे. दरम्यान, बनिता संधू ही बॉलिवूडमध्ये काम करणारी अभिनेत्री आहे. तिने वरुण धवन सोबत 2018 मध्ये आलेल्या 'ऑक्टोबर' चित्रपटातून पदार्पण केले. बनिताने तमिळ चित्रपट आदित्य वर्मा आणि अमेरिकन सायन्स फिक्शन सिरीज Pandora मध्ये देखील काम केले आहे. ती शेवटचा विकी कौशलच्या सरदार उधममध्ये दिसली होती. तानिया श्रॉफ ही उद्योगपती जयदेव श्रॉफ आणि रुमिला श्रॉफ यांची मुलगी आहे. सध्या ती 'टडप' स्टार अहान शेट्टीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

Ye Prem Mol Liya Review: ४ वर्षांनंतर सूरज बडजात्या घेऊन येत आहेत नवा रोमँटिक ड्रामा; जाणून घ्या कोणते कलाकार झळकणार आणि काय असेल कथा?

'ईठा' आणि 'मातृभूमी' या चित्रपटांच्या प्रदर्शन तारखांमध्ये टक्कर; सलमान खानने माफी मागितली; म्हणाला....

सामंथा रुथ प्रभू आई झाली; अभिनेत्रीने गोंडस मुलाला जन्म दिला

हिवाळ्यात स्वर्गासारखा अनुभव घ्यायचा असेल भारतात या ठिकाणी नक्की भेट द्या

अभिनेते नितीश भारद्वाज यांनी 'रामायण'वर जोरदार टीका केली; म्हणाले, "रावणाला नायक बनवण्यात आले''

पुढील लेख
Show comments