सोमवार, 7 ऑक्टोबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 6 डिसेंबर 2022 (12:02 IST)

पठाण चित्रपटाचे नवीन पोस्टर, शाहरुख खानचा गनसोबत कूल लूक

शाहरुख खानचे तीन चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहेत. पहिला क्रमांक पठाणचा आहे जो जानेवारीमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला असून त्यानंतर किंग खानचे चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. त्यांना लवकरच हा चित्रपट पाहायला मिळावा अशी त्यांची इच्छा आहे.
 
चित्रपटाचे निर्माते सतत पोस्टर रिलीज करून चाहत्यांच्या संयमाची परीक्षा घेत आहेत. आता एक नवीन पोस्टर आले आहे ज्यामध्ये शाहरुख खान दिसत आहे. शाहरुख गन  घेऊन उभा असलेला खूपच मस्त दिसत आहे. हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत यशराज फिल्म्सने लिहिलं आहे - He always gets a shotgun to the fight! #Pathaan 
 
शाहरुखशिवाय पठाणमध्ये दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट स्टायलिश अॅक्शनने भरलेला आहे. हिंदीसोबतच तमिळ आणि तेलुगूमध्येही डब करून चित्रपट रिलीज करण्यात येणार आहे.