रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

अशी केली शाहरुखने इरफान खानला मदत

शाहरुख आणि इरफान यांच्यातील मैत्री तर सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे उपचारासाठी लंडनला रवाना होण्यापूर्वी इरफानला शाहरुखची भेट घ्यायची होती. याकारणामुळे इरफानच्या पत्नीने सुतापाने शाहरुखला फोन करुन मुंबईतील आयलॅंड येथे त्यांच्या घरी येण्याची विनंती केली होती. या विनंतीचा मान राखत शाहरुखही इरफानला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेला. या भेटीमध्ये शाहरुख आणि इरफानने दोन तास चर्चा केल्यानंतर शाहरुखने इरफानला भावनिक आधार देण्याबरोबरच त्याच्या लंडनमधील घराच्या चाव्याही इरफानच्या स्वाधीन केल्या. 

उपचार घेताना इरफानला कोणत्याही हॉटेलमध्ये राहण्याची गरज भासू नये यासाठी शाहरुखने त्याच्या घराच्या चाव्या इरफानला देऊ केल्या. उपचार सुरु असताना प्रत्येक रुग्णाला घरच्या मायेची गरज असते. त्यामुळे जर आपलंच घर असेल तर रुग्णाची रिकव्हरी व्हायला मदत होते. त्यामुळे शाहरुखने इरफानला घराच्या चाव्या दिल्या. या चाव्या घेण्यासाठी इरफाने प्रथम नकार दिला होता. मात्र, शाहरुख पुढे त्याचा निभाव लागला नाही आणि त्याला चाव्या स्वीकाराव्या लागल्या.