काजल ने घेतले पत्रकारितेचे प्रशिक्षण
दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अग्रवालने बॉलिवूडध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून भूमिका मिळवली आणि तिची बॉलिवूड एंट्री अनेकांना भावली. त्यानंतर काजलने स्पेशल 26 (2013) या चित्रपटातही काम केले. दो लफ्जो की कहानी यातही काजलने भूमिका केली पण त्यानंतर काजल पुन्हा साऊथकडे स्थिरावली. काजलने सेंट एनी शाळेतून शिक्षण पूर्ण केले आहे जे मुंबईतील सर्वात टॉप स्कूलमध्ये गणले जाते. त्यानंतर काजलने मुंबई येथील केसी कॉलेजधून मास मीडियाचे शिक्षण घेतले आहे. कॉलेजमध्ये असतानाच तिने तिला मॉडेलिंग करायचे ठरवले होते. यासाठी तिने तयारीही सुरु केली. फायनल ईअरपर्यंत काजलने मॉडेलिंग करण्यास सुरुवात केली. तिने बॉलिवूड चित्रपट क्यो हो गया ना मध्ये डेब्यू केला. यात ती दिया मिर्झाच्या मैत्रिणीच्या भूमिकेत होती. यानंतर तिने दिग्दर्शक तेजा यांचा चित्रपट 'लक्ष्मी कल्याणम'मधून कल्याण राम या अभिनेत्यासोबत तेलुगू चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. आज काजल तेलुगू तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. हिंदी इंडस्ट्रीधील एव्हरग्रीन अभिनेत्री रेखापासून ते ड्रीम गर्ल हेमा मालिनी आणि हवा-हवाई गर्ल श्रीदेवीपर्यंत अनेक दाक्षिणात्यअभिनेत्रींनी बॉलिवूडमध्ये नाव कमावले आहे. आजही त्यांचे लाखो चाहते आहेत.