शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 मार्च 2023 (10:33 IST)

शाहरुख खानच्या सुरक्षेचा भंग, भिंत ओलांडून दोन तरुण मन्नत मध्ये घुसले

मुंबई अभिनेता शाहरुख खानच्या 'मन्नत' या बंगल्यात घुसण्याचा आरोप करत मुंबई पोलिसांनी गुजरातमधील दोन तरुणांना ताब्यात घेतले. दोन्ही तरुण बंगल्याच्या तिसऱ्या मजल्यावर पोहोचले होते. हे दोन्ही तरुण शाहरुख खानचे चाहते असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
  वांद्रे पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 19-20 वर्षे वयोगटातील दोन तरुणांना ड्युटीवर असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बंगल्यात प्रवेश करताना पकडले. चौकशीदरम्यान दोघांनी पोलिसांना सांगितले की, आपण गुजरातमधून आलो आहोत आणि त्यांना शाहरुखला भेटायचे आहे.
 
परवानगीशिवाय परिसरात प्रवेश करणे यासह भारतीय दंड संहितेच्या इतर कलमांखाली गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
 
उल्लेखनीय आहे की बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा नुकताच प्रदर्शित झालेला 'पठाण' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाद्वारे शाहरुख तब्बल 4 वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतला आहे.
 
दरम्यान, शाहरुखचे कुटुंब कायदेशीर कचाट्यात अडकले आहे. शाहरुख खानची पत्नी गौरी खानविरोधात लखनऊमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ही बाब मालमत्तेशी संबंधित आहे. लखनऊमधील सुशांत गोल्फ सिटी पोलिस ठाण्यात गौरीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.