बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. ती टि्वटर, इन्स्टाग्रामवर आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते. पण आता सोनाक्षीने तिचं टि्वटर अकाउंट डिअॅक्टिवेट केलं आहे. सोनाक्षीने इन्स्टाग्रामवर स्पष्ट केलं की ती टि्वटरवर नाहीये. यासंबंधीचा एक स्क्रिनशॉट तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला. यासोबतच तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, आग लगे बस्ती में......