गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018 (11:23 IST)

लोकप्रिय गाण्यावर सोनाक्षी थिरकणार

बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाने आपल्या अभिनय व डान्स कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. सध्या ती अभिषेक वर्मन दिग्दर्शित 'कलंक' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटात सोनाक्षी आयटम साँग करताना दिसणार आहे. ती मुंगडा या गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. 1977 मध्ये गाजलेल्या 'इनकार' सिनेमातील गाजलेले गाणे 'हा मुंगडा, मैं गुड की कली...'वर अभिनेत्री हेलन यांनी जबरदस्त परफॉर्मन्स दिला होता. हे गाणे 'कलंक' चित्रपटात रिक्रिएट करण्यात आले असल्याचे स्वतः सोनाक्षीने सांगितले. 
 
यापूर्वीही सोनाक्षीने हेलन यांच्या एका गाण्यावर जबरदस्त परफॉर्मन्स केला होता. हॅपी फिर भाग जायेगी चित्रपटातील 'चिन चिन चू' या रिक्रिएट केलेल्या गाण्यावर हेलनने डान्स केला होता. आता पुन्हा एकदा तशाच हिट गाण्याच्या रिक्रिएशनमध्ये परफॉर्म करायला मिळणार म्हणून सोनाक्षी खूप खूश आहे. या मेगास्टारर चित्रपटात माधुरी व संजयशिवाय सोनाक्षी सिन्हा, आलिया भट्ट, वरूण धवन आणि आदित्य राय कपूर यांची वर्णी लागली आहे.