सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

सुजैन बर्नेट साकारणार सोनिया गांधींची भूमिका

लवकरच संजय बारु यांच्या 'द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टरः द मेकिंग अ‍ॅण्ड अनमेकिंग ऑफ मनमोहन सिंह' वादग्रस्त पुस्तकावर आधारित चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार असून जर्मन अभिनेत्रीची निवड चित्रपटात काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भूमिकेसाठी करण्यात आली आहे. 

काँग्रेस हायकमांडची भूमिका जर्मन अभिनेत्री सुजैन बर्नेट चित्रपटात साकारताना दिसणार आहे. या भूमिकेसाठी याआधी एका इटालियन अभिनेत्रीची निवड करण्यात आली होती, पण सुजैन बर्नेटचे ऑडिशन पाहिल्यानंतर तिच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. अनुप खेर या चित्रपटात माजी पंतप्रधान नोहन सिंग यांची भूमिका साकारणार आहेत.

याआधीही सोनिया गांधींची भूमिका सुजैन बर्नेटने निभावली आहे. अभिनेता-दिग्दर्शक शेखर कपूर यांनी निवेदन केलेल्या टीव्ही सीरिज प्रधानमंत्री मध्ये याआधी तिने सोनिया गांधींची भूमिका साकारली होती.