बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018 (15:02 IST)

सध्या लग्नाचा इरादा नाही!

दीपिका पदुकोण व रणवीर सिंग आणि प्रियांका चोप्रा व निक जोनास पाठोपाठ सुश्मिता सेन व रोहन शॉल लग्रबेडीत अडकणार, अशी बातमी   होती. पण तूर्तास सुश्मिता लग्राचा कुठलाही इरादा नाहीये. अर्थात रोहनसोबत तिचा रोमान्स जोरात आहे. होय, खुद्द सुश्मिताने याचा खुलासा केला आहे. सुश्मिताने स्वतःचा एक एक्सरसाईज व्हिडिओ शेअर करत, तिच्या व रोहनच्या लग्राच्या बातम्या निव्वळ अफवा असल्याचे म्हटले आहे. 'मी  लग्रासाठी तयार होतेय, असा जगाचा कयास आहे पण या सगळ्या बातम्या व्यर्थ आहेत. तूर्तास लग्राचा कुठलाही इरादा नाही. सध्या रोहनसोबत रोमान्स सुरू आहे आणि हे सांगणे पुरेसे आहे. मी सत्य काय ते सांगितलेयं. सर्वांना प्रेम...,' असे सुश्मिताने लिहिलेय. सुश्मिताच्या या पोस्टने एक गोष्ट स्पष्ट झालीय, ती म्हणजे, तूर्तास रोहनसोबत रोमान्स पुरेसा आहे. कदाचित या नात्याला सुश पुरेसा वेळ देऊ इच्छिते. सुश्मिता सध्या मोठ्या पडापासून दूर आहे. पण रोमान्स व लूक्सच्या बातम्यामुंळे ती कायम चर्चेत असते. सुश्मिता सिंगल मदर आहे. दोन मुलींना तिने दत्तक घेतले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुश्मिताच्या आयुष्यात रोहन शॉलने एन्ट्री घेतलीय. सुश्मिता व रोहन यांच्यातील जवळीक चांगलीच वाढली आहे. एका फॅशन इव्हेंटमध्ये दोघांचीही भेट झाली आणि पुढे दोघेही एकेकांच्या प्रेमात पडले. अलीकडे सुश व रोहन दोघेही बिनधास्तपणे फिरताना दिसत आहेत. दोघांनीही आपले नाते सार्वजनिक केले आहे.