suvichar

15 ऑक्टोबरपासून उघडणार चित्रपटगृहं, तर मग तयार राहा हा सिनेमा बघण्यासाठी

सोमवार, 12 ऑक्टोबर 2020 (06:35 IST)
पुढील आठवड्यात 15 ऑक्टोबरपासून सिनेमा हॉल्स (Cinema Halls) उघडण्यात येणार आहे. कंटेनमेंट झोन वगळता इतर भागात ही सिनेमागृहं उघडण्यात येतील. सिनेमागृहांमध्ये केवळ 50 टक्के सीट्स उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या नियमाचे पालन करूनच सिनेमा हॉल आणि मल्टिप्लेक्स उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. दोन सीट्सच्या मधील एक सीट रिकामी ठेवली जाईल, त्याचप्रमाणे मधल्या रिकाम्या असणाऱ्या सीटवर कुणी बसू नये याकरता मार्क करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सॅनिटायझेशन आणि इतर खबरदारी घेत सिनेमा गृहं खुली केली जाणार आहे.
 
सिनेमागृहात सर्वात आधी प्रदर्शित होणार हा सिनेमा
दरम्यान मार्च महिन्यापासून कोणताही सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झालेला नाही. बहुतांश सिनेमा या काळात ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आले. अशावेळी चाहत्यांना असा प्रश्न पडला आहे की, आता थिएटर्स सुरू झाल्यानंतर सर्वात आधी कोणता सिनेमा प्रदर्शित होईल?
मीडिया अहवालानुसार 15 ऑक्टोबरनंतर प्रदर्शित होणारा पहिला सिनेमा 'खाली पिली' (Khaali Peeli)' असणार आहे. खाली पील चित्रपटात इशान खट्टर (Ishan Khattar) आणि अनन्या पांडे ही फ्रेश जोडी पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहे.
 
ओटीटीवर आधीच प्रदर्शित झाला आहे सिनेमा
खाली पिली हा सिनेमा याआधी ओटीटी  प्लॅटफॉर्मवर 2 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला आहे. झी प्लेक्सवर हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला होता. त्यामुळे हे सांगणे थोडे कठीण आहे की, या सिनेमाची थिएटरमध्ये कमाई कितपत होईल. त्याचप्रमाणे सरकारच्या गाइडलाइननुसार सिनेमागृहातील केवळ 50 टक्के सीट्ससाठीच बुकिंग होणार आहे. त्यामुळे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चालणार की त्याचे नुकसान होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल
 
या सिनेमामध्ये इशान खट्टर टॅक्सीवाल्याच्या भूमिकेत आहे. त्याच्या अपोझिट अनन्या पांडे असणार आहे. अनन्या आणि इशान व्यतिरिक्त या सिनेमामध्ये जयदीप अहलावत देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 'पाताल लोक' फेम जयदीप यांनी या सिनेमामध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे.

सर्व पहा

धर्मेंद्र यांच्या बायोपिकमध्ये मुख्य अभिनेता कोण साकारणार?बॉबी देओलने हे उत्तर दिले

खिशाला कात्री न लावता सरकारी बजेट पॅकेजेसमध्ये फॅमिलीसोबत सुरक्षितपणे फिरून या

चित्रपट महामंडळाला स्थिर आणि कृतिशील कार्यकारिणी देण्याची समर्थ पॅनलची ग्वाही

रणवीर सिंगने एफडब्ल्यूआयसीई (FWICE) बंदीविरोधात न्यायालयात धाव घेतली, कायदेशीर नोटीस पाठवली

'दुसरा राम कोणालाही बघायचा नाही', रामायणममधील रणबीर कपूरच्या कास्टिंगच्या वादावर अरुण गोविल यांचे मोठे विधान

सर्व पहा

शेखर सुमनच्या गर्विष्ठ राजा आणि त्याच्या दरबारातील खुशामतखोराच्या व्हिडिओमुळे एवढा गदारोळ का झाला

ताल'च्या सिक्वेलवर सुभाष घई यांनी संकेत दिले, चित्रपट समीक्षक रॉजर एबर्ट यांनी प्रशंसा केली

हरियाणवी गायक आणि विनोदी कलाकार पेप्सी शर्मा यांचे वयाच्या ३८ व्या वर्षी निधन

मराठी चित्रपट 'तिघी' आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकला, न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार पटकावला

राखी गुलजार यांनी आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाला पाठिंबा दिला; म्हणाल्या-"वयाच्या ६० व्या वर्षी लग्न करण्यात काय अडचण?"

पुढील लेख
Show comments